राजस्थान स्पेशल तीळ पापडी साहित्य
राजस्थान स्पेशल तीळ पापडी बनवण्यासाठी अगदी मोजकं साहित्य लागतं. कमी साहित्यात हा पदार्थ तयार होतो. साखर, तीळ, तूप आणि पिस्ता एवढ्या साहित्यातून ही चविष्ट राजस्थान स्पेशल तीळ पापडी तयार करता येते.
दारूसोबत 'हे' पदार्थ खाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण ! 99% लोकांना हे माहीतच नाही
advertisement
राजस्थान स्पेशल तीळ पापडी कृती
सुरुवातीला तीळ चांगले भाजून घ्या. तीळ भाजून झाल्यावर ते प्लेटमध्ये काढून गार होऊ द्या. आता पिस्ते बारीक चिरून घ्या. तीळ पापडी लाटण्यासाठी किचन कट्ट्यावर आणि लाटण्याला थोडंसं तूप लावून ठेवा. पॅन गरम झाल्यावर त्यामध्ये साखर घाला. साखर सतत ढवळत राहा आणि ती पूर्णपणे वितळवून घ्या. साखर वितळताना गॅसची फ्लेम मंद ठेवा. साखर पूर्ण वितळल्यानंतर त्यामध्ये भाजलेले तीळ घालून चांगलं मिक्स करा. यानंतर थोडे पिस्त्याचे तुकडे घाला आणि पुन्हा मिक्स करा. लगेचच मिश्रण पातळ लाटून घ्या. लाटून झाल्यावर अशा प्रकारे तुमची राजस्थानी स्पेशल तीळ पापडी तयार होते.





