TRENDING:

One App: वन ॲप काय आहे, कसा होईल त्याचा वापर?

Last Updated:

Pm Modi Launch One App: पंतप्रधान मुंबई वन या ‘इंटिग्रेटेड कॉमन मोबिलिटी ॲप’ चा प्रारंभही करतील. हे ॲप मेट्रो, मोनोरेल, उपनगरीय रेल्वे आणि बस अशा सर्व प्रकारच्या सार्वजनिक परिवहन सेवा वापर करणा-यांसाठी असणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पंतप्रधान मुंबई वन या ‘इंटिग्रेटेड कॉमन मोबिलिटी ॲप’ चा प्रारंभही करतील. हे ॲप मेट्रो, मोनोरेल, उपनगरीय रेल्वे आणि बस अशा सर्व प्रकारच्या सार्वजनिक परिवहन सेवा वापर करणा-यांसाठी असणार आहे. यामध्ये मुंबई मेट्रो मार्गिका 2A आणि 7, मुंबई मेट्रो मार्गिका 3, मुंबई मेट्रो मार्गिका 1, मुंबई मोनोरेल, नवी मुंबई मेट्रो, मुंबई उपनगरीय रेल्वे, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन, ठाणे महानगरपालिका परिवहन, मीरा भाईंदर महानगरपालिका परिवहन, कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन आणि नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेचा अंतर्भाव असणार आहे.
One App: वन ॲप काय आहे, कसा होईल त्याचा वापर?
One App: वन ॲप काय आहे, कसा होईल त्याचा वापर?
advertisement

मुंबई वन ॲपमुळे प्रवाशांना अनेक लाभ होतील. याअंतर्गत अनेक सार्वजनिक परिवहन सेवा पुरवठादारांच्या सेवेचे तिकीट काढता येईल, डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळेल आणि रांगेत उभे राहण्याची गरज उरणार नाही, एकापेक्षा अधिक वाहतूक पर्यायांची गरज असलेल्या प्रवासासाठी एकाच बहुआयामी तिकिटाची उपलब्धता अशा सोयींचा समावेश आहे. या ॲपच्या माध्यमातून विलंब होत असेल तर त्याबद्दलची माहिती, पर्यायी मार्ग आणि अंदाजित आगमनाच्या वेळेबद्दल वास्तविक वेळेतील प्रवासाची माहितीही मिळू शकणार आहे. यासोबतच जवळपासची स्थानके, आकर्षक आणि महत्त्वाची ठिकाणे यांबद्दलची नकाशासह माहिती, तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेची सुनिश्चिती करण्यासाठी आपत्कालीन वा आणीबाणीच्या घटनांची पूर्वसूचना देणाची सुविधाही यात आहेत. या सर्व सोयी सुविधा एकाच ठिकाणी एकात्मिकपण उपलब्ध होणार असल्याने कार्यक्षमता आणि सुरक्षिततेत वाढ होईल, आणि संपूर्ण मुंबईतील सार्वजनिक परिवहन सेवेच्या अनुभवातही बदल घडून येतील.

advertisement

पंतप्रधान महाराष्ट्रातील कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोन्मेष विभागाचा पथदर्शी उपक्रम असलेल्या ‘स्टेप’ अर्थात अल्प - मुदतीच्या रोजगार कार्यक्रमाचे देखील उद्घाटन करतील. 400 सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि 150 सरकारी तांत्रिक उच्च विद्यालयांमध्ये या कार्यक्रमाचा प्रारंभ केला जाईल. हा कार्यक्रम रोजगारक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने कौशल्य विकासाला उद्योग जगतांच्या गरजांसोबत जोडण्याच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल ठरणार आहे. स्टेप या कार्यक्रमाअंतर्गत 2,500 नवीन प्रशिक्षण तुकड्या सुरू केल्या जातील, यात महिलांसाठी 364 विशेष तुकड्या आणि कृत्रिम प्रज्ञा, इंटरनेट ऑफ थिंग्ज, इलेक्ट्रिक वाहने, सौर आणि ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इत्यादीसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या 408 तुकड्या असणार आहेत.

advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर 8 आणि 9 ऑक्टोबर 2025 रोजी भारताच्या भेटीवर येणार आहेत. पंतप्रधान स्टार्मरर यांचा हा पहिला अधिकृत भारत दौरा असणार आहे. या भेटीदरम्यान, दोन्ही नेते व्हिजन 2035 च्या अनुषंगाने भारत आणि ब्रिटनमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या विविध पैलूंच्या प्रगतीचा आढावा घेतील. व्हिजन 2035 हा व्यापार आणि गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, संरक्षण आणि सुरक्षा, हवामान आणि ऊर्जा, आरोग्य, शिक्षण आणि दोन्ही देशांतील नागरिकांमधील परस्पर संबंध या प्रमुख स्तंभांशी जोडलेल्या कार्यक्रम आणि उपक्रमांचा एक केंद्रित आणि 10 वर्षांचा कालबद्ध मार्गदर्शक आराखडा आहे.

advertisement

भारत आणि ब्रिटनमधील सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे भारत आणि ब्रिटनमधील आर्थिक भागीदारीचा मध्यवर्ती स्तंभ म्हणून भविष्याच्यादृष्टीने उपलब्ध झालेल्या संधींबाबदतही दोन्ही नेते उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातील आघाडीच्या व्यक्तिमत्वांशी संवाद साधणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये प्रादेशिक आणि महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवरही विचारांची देवाणघेवाण होईल. याशिवाय ते उद्योग क्षेत्रातील तज्ञ, धोरणकर्ते आणि नवोन्मेषकारांशी देखील संवाद साधणार आहेत. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर, जागतिक फिनटेक महोत्सवाच्या 6 व्या आवृत्तीमध्येही पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान स्टार्मर सहभागी होणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.

advertisement

जागतिक फिनटेक महोत्सव 2025 च्या निमित्ताने जगभरातील नवोन्मेषकार, धोरणकर्ते, केंद्रीय बँकांचे प्रतिनिधी, नियामक, गुंतवणूकदार, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील आघाडीची व्यक्तिमत्वे एकाच ठिकाणी येणार आहे. चांगल्या जगासाठी वित्त परिसंस्थेचे सक्षमीकरण ही या महोत्सवाची संकल्पना असून. या संकल्पनेला कृत्रिम प्रज्ञा, संवर्धित बुद्धिमत्ता, नवोन्मेष आणि समावेशकतेची जोड दिली गेली आहे. या संकल्पनेतून नैतिक आणि शाश्वत आर्थिक भविष्याच्या जडणघडणीसाठी तंत्रज्ञान आणि मानवी वैचारिकतेच्या अभिसरणाचे महत्व अधोरेखित केले जाणार आहे. यंदाच्या या महोत्सवात 75 हून अधिक देशांतील 100,000 पेक्षा जास्त जण सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, नवीन सोयाबीनचे दर घसरलेलेच, आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

यामुळे हा महोत्सव जगातील सर्वात मोठ्या फिनटेक महोत्सवांपैकी एक ठरणार आहे. या महोत्सवात सुमारे 7,500 कंपन्या, 800 वक्ते, 400 प्रदर्शक आणि भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय दोन्ही अधिकारक्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारे 70 नियामक सहभागी होणार आहेत. याशिवाय सिंगापूरचे चलन प्राधिकरण, जर्मनीचे ड्यूश बुंडेसबँक , बँक दी फ्रान्स आणि स्विस वित्तीय बाजार पर्यवेक्षी प्राधिकरण यांसारख्या प्रसिद्ध नियामक आंतरराष्ट्रीय संस्थांही या महोत्सवात सहभागी होणार आहेत. त्यांच्या सहभागामुळे जागतिक फिनटेक महोत्सवाचे वित्तीय धोरणाविषयक संवाद आणि सहकार्यासाठी जागतिक मंच म्हणून वाढत असलेले महत्त्व अधोरेखित होणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
One App: वन ॲप काय आहे, कसा होईल त्याचा वापर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल