TRENDING:

DGP सदानंद दाते यांच्या नावाने सव्वा २ कोटींची खंडणी उकळली, बनावट सही केली, भामटा सापडलाच!

Last Updated:

सदानंद दाते यांच्या बनावट स्वाक्षरीची नोटीस पाठवून ज्येष्ठाकडून आरोपीने २ कोटी २५ लाख रूपये उकळले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या नावाने ज्येष्ठ नागरिकाकडून एका भामट्याने सव्वा दोन कोटींची खंडणी वसूल केली. सदानंद दाते यांच्या बनावट स्वाक्षरीची नोटीस पाठवून ज्येष्ठाकडून २ कोटी २५ लाख रूपये उकळले. याप्रकरणी आरोपी किशन मकवाना (वय ३५) याच्या नावे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदानंद दाते (पोलीस महासंचालक)
सदानंद दाते (पोलीस महासंचालक)
advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मकवाना सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या संपर्कात होता आणि फसवणूक करण्यासाठी पीडितेच्या बँक खात्याचा वापर करत होता. ७७ वर्षीय पीडित ज्येष्ठ नागरिक गोरेगाव येथे राहतात. नोव्हेंबर २०२५ मध्ये, त्यांना दोन बनावट पोलिस अधिकाऱ्यांचा फोन आला. तुमच्या आधार कार्डचा वापर करून जम्मू काश्मीरमध्ये एका बँकेत खाते उघडल्याचा दावा केला. या खात्यात दहशतवाद्यांच्या नावाने ठेवी आहेत. जर त्याला या प्रकरणातून सुटायचे असेल तर ७० रुपये द्यावे लागतील. जर तपासात सहकार्य करू शकला नाही तर त्याला अटक केली जाईल, असे कथित पोलीस अधिकाऱ्यांनी ज्येष्ठाला सांगितले. तसेच व्हाॉट्सअॅपवर बनावट वॉरंटही पाठवले.

advertisement

नंतर १८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत, ज्येष्ठ नागरिकाला या प्रकरणातून वाचवण्याच्या नावाखाली, अनेक वेळा धमकावले आणि त्यांच्या बँक खात्यात २.२५ कोटी रुपये ट्रान्सफर करायला लावले. पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर, आरोपींचे कॉल अचानक बंद झाले. नंतर, आपण सायबर फसवणुकीचा बळी झालो आहे, हे ज्येष्ठ व्यक्तीच्या लक्षात आले. नंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.

advertisement

सदानंद दाते यांच्या नावाचा वापर करून आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकरणात फसवणूक आणि लूट झाल्याची प्रकरणे आहेत. यात प्रामुख्याने 'डिजिटल अरेस्ट' या पद्धतीचा वापर करण्यात आला असून दाते यांच्या नावाचा वापर करून फसवणूक केल्याची ही चौथी घटना आहे. चारही प्रकरणात गुन्हे दाखल आहेत.

घटना १-

- डिजिटल अरेस्ट आणि 70 लाखांची लूट

advertisement

- या प्रकरणात मुंबई पोलिसांनी 6 आरोपींच्या एका टोळीला अटक केली आहे अटक

- या टोळीनं सदानंद दाते यांच्या नावाचा वापर करून 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 70 लाख रुपयांची केली होती ऑनलाइन फसवणूक

घटना २-

-मनी लाँड्रिंगची भीती दाखवून गंडा

-एका 75 वर्षीय निवृत्त कर्मचाऱ्याला दिल्लीतील बॉम्बस्फोट आणि मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात अडकवण्याची दाखवली भीती

advertisement

-सदानंद दाते यांच्या नावाने साडेसोळा लाखाची केली फसवणूक

-या गुन्ह्याचा तपास सुरू

घटना ३-

-सोशल प्लॅटफॉर्मचा वापर करून खंडणीची मागणी

-व्हॉट्सॲपवर दोन वेगवेगळ्या क्रमांकांवरून अश्लील फोटो पाठवून केलं ब्लॅकमेल

-कायदेशीर कारवाईची भीती दाखवून 10 लाखाची मागितली खंडणी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्रांक्षाला 14000 रुपये दर, कांदा आणि केळीला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

-या दाखल गुन्ह्याचा तपास सुरू

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
DGP सदानंद दाते यांच्या नावाने सव्वा २ कोटींची खंडणी उकळली, बनावट सही केली, भामटा सापडलाच!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल