मराठा समाजाला ओबीसी आरक्षण हवे अर्थात कुणबी दाखले हवे, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. याच अनुषंगाने बोलताना गेवराई तालुक्यातील शिंगारवाडी फाटा येथे झालेल्या सभेमध्ये लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजासमोर विवाह प्रस्ताव ठेवला. आता ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये कोणताही फरक राहिलेला नाही. त्यांनी आमच्यातल्या पोरांना (ओबीसी) मुली दिल्या पाहिजेत, अशा आशयाचे वक्तव्य केले.
advertisement
लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजातील महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले असा आरोप करून गोपाल शिंदे यांच्या तक्रारीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरक्षण प्रश्नावर बोलताना लक्ष्मण हाके यांनी महिलांचा अपमान केला, असे सांगत शिंदे यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गल्लीतील टपोरी पोरांसारखी त्यांची भाषा,तुम्हाला नीट करायला आम्हाला फारसा वेळ लागणार नाही-विनोद पाटील
हाके अनेक दिवसांपासून असंबंध बडबड करीत आहेत. काल-परवा त्यांनी मराठा समाजातील महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे दाखले देत फार वैचारिक (?) असल्याचं भासवतात. प्रत्यक्षात गल्लीतील टपोरी पोरांसारखी त्यांची भाषा आहे. मोठमोठ्यानं बोलत अत्यंत पोरकट भाषणं ते करत असतात. वाद विकोपाला कसा जाईल, यावर त्यांचा भर असतो. हाके जिभेला आवर घालावा, तुम्हाला नीट करायला आम्हाला फारसा वेळ लागणार नाही. अधिकचं बोलणं नको. तेवढी त्यांची लायकी नाही, असे ट्विट करून मराठा समाजाचे नेते विनोद पाटील यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.
