शिवनीका संस्थानच्या कारभारावरून आता राज्याचे राजकारण तापले आहे. या संस्थानच्या संपूर्ण संचालक मंडळाची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विशेष म्हणजे या संचालक मंडळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांचाही समावेश असल्याने विरोधकांसोबतच आता पक्षांतर्गतही दबक्या आवाजात चर्चेला उधाण आले आहे.
चाकणकरांच्या अडचणीत वाढ
advertisement
शिवनीका संस्थानच्या आर्थिक व्यवहारांबाबत आणि व्यवस्थापनाबाबत काही तक्रारी समोर आल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत सरकारने एसआयटी चौकशीचा बडगा उगारला आहे. रूपाली चाकणकर या या संस्थानच्या सक्रिय सदस्य असल्याने त्यांचीही चौकशी या प्रक्रियेत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे एका मोठ्या महिला नेत्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
राष्ट्रवादीच्या बैठकीत 'हायव्होल्टेज' चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत केवळ संघटनात्मक बांधणीच नाही, तर चाकणकर यांच्या चौकशीचा मुद्दाही अग्रक्रमाने चर्चेला घेतला जाणार आहे. पक्षाची प्रतिमा डागाळू नये, यासाठी वरिष्ठ नेते यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
अशोक खरातच्या संस्थेच्या उत्पन्नात आठ वर्षांत तब्बल 74 पट
मिरगावातल्या श्री शिवनिका संस्थेच्या नावाखाली काळ्या पैशांचा मोठा खेळ सुरू होता. महिलांना भोंदूगिरीच्या जाळ्यात ओढून अत्याचार करणाऱ्या अशोक खरातच्या आर्थिक साम्राज्याचे धागेदोरे आता पोलिस तपासातून समोर येता आहेत. विशेष म्हणजे, गेल्या आठ वर्षांत या संस्थेच्या उत्पन्नात तब्बल 74 पट वाढ झाल्याची माहिती समोर आली असून यामुळे खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा :
