TRENDING:

वयात 15 वर्षांचं अंतर, शेजारच्या तरुणीला बहीण मानायचा, नराधमाचं घरात घुसून भयंकर कृत्य, नागपुरला हादरवणारी घटना!

Last Updated:

Murder in Nagpur: नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. गेल्या वर्षभरापासून अबोला धरल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्या शेजारी राहणाऱ्या तरुणीचा निर्घृण खून केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. गेल्या वर्षभरापासून अबोला धरल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्या शेजारी राहणाऱ्या तरुणीचा निर्घृण खून केला. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने आत्महत्येचा बनाव रचला होता, मात्र पोलिसांनी कौशल्याने तपास करत अवघ्या काही तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
News18
News18
advertisement

नेमकं प्रकरण काय?

मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राजलक्ष्मी सोसायटीमधील प्रसाद विहारमध्ये ही घटना घडली. प्राची हेमराज खापेकर (२३) असे मृत तरुणीचे नाव आहे. प्राचीचा मृतदेह मंगळवारी रात्री तिच्या घरात पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत संशयास्पदरित्या आढळला होता. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचे वाटत होते, मात्र प्राथमिक तपासात पोलिसांना संशय आला.

शवविच्छेदन अहवालातून फुटले बिंग

advertisement

पोलिसांनी तातडीने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवला. मेयोच्या न्याय वैद्यकशास्त्र विभागाने दिलेल्या प्राथमिक अहवालात धक्कादायक माहिती समोर आली. प्राचीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून हा मृत्यू अनैसर्गिक असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. या अहवालामुळे आत्महत्येचा बनाव उघड झाला आणि पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली.

अबोला ठरला मृत्यूला कारणीभूत

advertisement

पोलिसांनी संशयावरून प्राचीचा शेजारी शेखर ढोरे (३८) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच शेखरने गुन्ह्याची कबुली दिली. तपासात समोर आले की, प्राची ही शेखरला आपला भाऊ मानत होती आणि तिचे त्याच्या घरी येणे-जाणे होते. मात्र, शेखरचा स्वभाव विचित्र असल्याने प्राचीच्या कुटुंबीयांनी तिला त्याच्याशी संपर्क ठेवण्यास मनाई केली होती.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पावभाजी ते अंडा राईस, फक्त 30 रुपयांपासून,पुण्यात इथं असते खाण्यासाठी मोठी गर्दी
सर्व पहा

याच कारणामुळे गेल्या वर्षभरापासून प्राची शेखरशी बोलत नव्हती. हाच राग मनात धरून शेखरने संधी साधली. संतापाच्या भरात त्याने प्राचीचे डोके जमिनीवर आपटले, ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला. गुन्हा लपवण्यासाठी त्याने तिचा मृतदेह पंख्याला लटकवून आत्महत्येचा बनाव केला होता. पण मानकापूर पोलिसांनी अतिशय गांभीर्याने तपास करत शेखरला बेड्या ठोकल्या. एका सुशिक्षित तरुणीचा अशा प्रकारे ओळखीच्याच व्यक्तीकडून खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वयात 15 वर्षांचं अंतर, शेजारच्या तरुणीला बहीण मानायचा, नराधमाचं घरात घुसून भयंकर कृत्य, नागपुरला हादरवणारी घटना!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल