या आउटलेटची सुरुवात पारंपरिक पारसी पदार्थांना आधुनिक, सोप्या आणि परवडणाऱ्या स्वरूपात मांडण्याच्या उद्देशाने करण्यात आली. अनेक पदार्थ सोया, अंडे किंवा विविध डाळींपासून तयार केले जात असल्याने हे पदार्थ प्रोटिन-रिच आहेत. त्यामुळे चव आणि आरोग्य यांचा उत्तम समतोल येथे पाहायला मिळतो.
फक्त 'हे' 2 पदार्थ रोज खा आणि १० पटीने मेंदूची ताकद वाढवा!Video
advertisement
विशेष म्हणजे, कोणत्याही पदार्थांमध्ये फूड कलर, बटर, चीज किंवा अजिनोमोटोचा वापर केला जात नाही. सोया खीमा पॅटीस कमी तेलात शॅलो फ्राय केली जाते, तर त्यासोबत दिला जाणारा केचप पूर्णपणे घरगुती पद्धतीने, कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह, रंग न वापरता तयार केला जातो. त्यामुळे ऑफिसमध्ये, प्रवासात किंवा कुठेही हे पदार्थ सहजपणे खाता येतात.
रुस्टम राईस हे क्यूएसआर फॉरमॅटमध्ये चालवले जाते. त्यामुळे कमी वेळेत जेवण मिळते आणि ग्राहक त्यांच्या भुकेनुसार प्रमाण निवडू शकतात. या आउटलेटमागील संकल्पना मांडणारे रोनक नाईक हे व्यवसायाने आर्किटेक्ट असून, त्यांनी आपल्या खाद्यसंस्कृतीविषयीच्या अभ्यासातून हा वेगळा प्रयोग साकारला आहे.
सध्या येथे 15 प्रकारचे पदार्थ उपलब्ध आहेत. यामध्ये धनसाक सूप, शेवगा सूप, धनसाक पावभाजी, अंडा धनिया राईस, सोया खीमा पॅटीस, सोया पुदिना राईस यांसारख्या पदार्थांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, हे पदार्थ अवघ्या 30 रुपयांपासून उपलब्ध आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पावधीतच रुस्टम राईसची ओळख वाढली असून, सिम्पल, गुड फूड देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे रोनक नाईक यांनी सांगितले.
कमी किमतीत, दर्जेदार आणि आरोग्यदायी इराणी–पारसी आणि महाराष्ट्रीयन जेवणाचा अनुभव घ्यायचा असेल, तर डेक्कनमधील रुस्टम राईस हे नक्कीच एक वेगळं आणि आवर्जून भेट द्यावं असं ठिकाण ठरत आहे.





