अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची जबाबदारी कोण घेणार, राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार, सरकारमध्ये त्यांची जबाबदारी कोण घेणार? अर्थ मंत्रालयाची जबाबदारी कुणाकडे जाणार? अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र उत्सुक होता. याच प्रश्नांची उत्तरे प्रफुल पटेल यांनी दिली.
NCP एकत्रिकरण होणार की नाही? पक्षाचा अध्यक्ष कोण होणार?
आमच्या समोर एकत्रिकरणाचा लगोलग विषय नाही. कारण येणाऱ्या दिवसांत पक्षासंबंधी आम्हाला बरेच निर्णय घ्यायचे आहेत. सुनेत्रा पवार यांच्याकडेच नेतृत्व सोपविण्याचा आमचा आग्रह आहे. त्यांच्या नेतृत्वात पक्षाला प्रगतीपथावर न्यायचंय. तसेच राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय माझ्याशिवाय होईल, अशी थेट उत्तरे प्रफुल पटेल यांनी दिली.
advertisement
पुणे बीडच्या पालकमंत्रिपदाचं काय?
राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी केलेल्या चर्चेनुसार सुनेत्रा पवार यांच्याकडेच पुणे आणि बीडचे पालकमंत्रिपद देण्यात आलेले आहे. महायुतीच्या दुसऱ्या कार्यकाळात अजित पवार यांनी पुणे आणि बीडचे पालकमंत्रिपद सांभाळले होते.
अर्थमंत्रिपद कुणाकडे?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तूर्त कुणाकडेही खाते दिलेले नाही. मात्र अर्थ आणि नियोजन खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहील. काही दिवसांत त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले.
