देवदर्शन आले होते मित्र
प्रफुल्ल त्रिमुखी, सिद्धेश काजवे, भीमराज आगाळे, विवेक शेलार आणि अन्य दोन मित्र असे एकूण पाच कॉलेजचे मित्र देवदर्शन आणि पर्यटनासाठी मुंबईहून गणपतीपुळे येथे आले होते. सकाळी गणपतीपुळ्याला पोहोचल्यानंतर त्यांनी एका खासगी निवासस्थानात मुक्काम केला होता. दुपारनंतर या तरुणांनी एकत्र समुद्रात मज्जा करण्याचा बेत आखला आणि ते समुद्रात उतरले. सायंकाळपर्यंत त्यांची मज्ज मस्ती सुरू होती.
advertisement
खोल पाण्यात उतरल्याने बुडू लागले
प्रफुल्ल त्रिमुखी, भीमराज आगाळे आणि विवेक शेलार या तिघांनी समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा अंदाज न आल्याने ते तिघेही बुडाले. इतर मित्रांना ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी आरडाओरडा केला. समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित असलेले मोरया वॉटर स्पोर्ट व्यावसायिक, जीवरक्षक, पोलीस आणि ग्रामस्थ तातडीने मदतीसाठी धावले. त्यांनी तिघांनाही पाण्यातून बाहेर काढलं मात्र तोपर्यंत एकाचा मृत्यू झाला होता. दोघांची प्रकृती बिघडली होती.
दोघांना वाचवण्यात यश
तिघांनाही गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केलं. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, प्रफुल्ल त्रिमुखी याला मृत घोषित केले. तर, भीमराज आगाळे आणि विवेक शेलार यांच्यावर तातडीने प्रथमोपचार करण्यात आले आणि त्यांना शुद्धीवर आणण्यात आले. अधिक उपचारांसाठी या दोघांना रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात (पाठवण्यात आले आहे.
