मला राजकारणात नाही तर समाजकारणात रस असून यंदाच्या निवडणुकीत शिरूर शहर विकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा आघाडीचे सर्वेसर्वा उद्योगपती आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश धरिवाल यांनी केलीय.
शिरूर नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असून गेल्या अनेक वर्षापासून शिरूर नगर परिषदेवर शिरूर शहर विकास आघाडीची सत्ता असल्याने यंदाच्या निवडणुकीत आघाडीची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र प्रकाश धारिवाल यांनी आता शिरूर शहर विकास आघाडी ही निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. धारिवाल यांच्या शिरूर शहरातील आशीर्वाद या निवासस्थानी त्यांनी कार्यकर्त्यासमोर भूमिका मांडली.
advertisement
शिरूरचे पक्षीय बलाबल काय?
शिरूर नगरपालिकेत शहर विकास आघाडीचे १७ नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे २ नगरसेवक तर लोकशाही क्रांती आघाडी आणि अपक्ष प्रत्येकी १ असे एकूण २१ नगरसेवक आहेत. भाजपने ‘शतप्रतिशत भाजप’चा नारा देत मागील निवडणुकीत दोन जागा जिंकत आपले अस्तित्व दाखवून दिले. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या निधनानंतर शहरात सर्वसमावेशक नेतृत्वाचा अभाव जाणवत आहे.
शिरूर नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव
शिरूर नगराध्यक्षपद यंदा ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असून या पदासाठी अनेक महिला नेत्या इच्छुक आहेत.
