कोथरुडच्या शास्त्रीनगर परिसरात ७ सप्टेंबर रोजी (गणेश विसर्जन) गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न निलेश घायवळ याच्या टोळीकडून करण्यात आला होता. केवळ पुण्यात आपली दहशत राहावी, याच हेतूने त्याने गोळीबार केल्याचे पोलीस तपासात समोर आले. दरम्यान निलेश घायवळ पोलिसांच्या हातावर तुरी देऊन परदेशात पसार झाला. निलेशला बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडले, अनेक पोलीस पथके त्याच्या मागावर होती. परंतु निलेश पोलिसांच्या हाताला लागला नाही.
advertisement
घायवळ टोळीविरोधात पुणे पोलिसांकडून ६,४५५ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
पुणे पोलिसांकडून गुंड निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीच्या ९ गुन्हेगारांवर तब्बल ६,४५५ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. १७ सप्टेंबर रोजी (गणेश विसर्जन) कोथरुडच्या शास्त्रीनगर परिसरात गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, घायवळने आपल्या साथीदारांना धमाका करा, शस्त्रे आणि पैसे मी देतो, केस झाली तर बाहेर काढण्याची जबाबदारी माझी... असे सांगून चिथावणी दिल्याचे पुरावे पोलिसांकडे आहेत.
कोणत्या ९ आरोपींवर पुणे पोलिसांकडून आरोपपत्र
१) मयुर उर्फ राकेश गुलाब कुंबरे
२) मयंक उर्फ मॉन्टी विजय व्यास
३) गणेश सतीश राऊत
४) दिनेश राम फाटक
५) आनंद अनिल चांदलेकर
६) मुसाब इलाही शेख
७) जयेश कृष्णा वाघ
८)अक्षय दिलीप गोगावळे
९) अजय महादेव सरोदे
