TRENDING:

रेल्वेची 'तत्काळ' तिकीटं काढून स्टेशनवर उभे राहायचे अन्...; 'ते' दृश्य पाहून अधिकारीही चक्रावले, दोघं ताब्यात

Last Updated:

दक्षता पथकाने या संशयितांचे मोबाईल तपासले असता अधिकाऱ्यांचेही डोळे विस्फारले. त्यांच्या मोबाईलमध्ये तब्बल ६० हजार रुपये किमतीची 'सक्रिय' तत्काळ तिकीटं आढळून आली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : सर्वसामान्य प्रवासी सकाळी ११ वाजता डोळ्यात तेल घालून 'तत्काळ' तिकीट काढण्यासाठी मोबाईल किंवा लॅपटॉपसमोर बसतो, मात्र काही सेकंदातच तिकीटं संपलेली असतात. प्रवाशांच्या याच हतबलतेचा फायदा घेणाऱ्या एका टोळीचा मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने पर्दाफाश केला आहे. सातारा जिल्ह्यातील वाठार रेल्वे स्थानकावर आरक्षित तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना रेल्वे पोलिसांनी रंगेहात बेड्या ठोकल्या आहेत.
तत्काळ तिकीटांचा काळा बाजार (AI Image)
तत्काळ तिकीटांचा काळा बाजार (AI Image)
advertisement

नेमकं 'ते' दृश्य काय होतं?

वाठार रेल्वे स्थानकाच्या आरक्षण खिडकीजवळ काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती दक्षता पथकाला मिळाली होती. रेल्वे अधिकारी साध्या वेशात तिथे पाळत ठेवून होते. यावेळी दोन व्यक्ती तिकीट खिडकीजवळ आणि मोबाईलवर काहीतरी गडबड करताना आढळल्या. तिकीट बुकिंगच्या वेळेत सामान्य प्रवाशांना डावलून हे दोघे तिकीटं मिळवत असल्याचे 'ते' दृश्य पाहताच पथकाने झडप घातली आणि दोघांना ताब्यात घेतले.

advertisement

मोबाईल तपासला अन् गुपित उघडलं!

दक्षता पथकाने या संशयितांचे मोबाईल तपासले असता अधिकाऱ्यांचेही डोळे विस्फारले. त्यांच्या मोबाईलमध्ये तब्बल ६० हजार रुपये किमतीची 'सक्रिय' तत्काळ तिकीटं आढळून आली. इतकेच नाही, तर गेल्या काही दिवसांत त्यांनी १ लाख रुपयांहून अधिक किमतीची तिकीटं चढ्या दराने विकल्याचे पुरावेही मिळाले आहेत. ही तिकीटं अवैध आयडी (ID) वापरून आणि यंत्रणेतील त्रुटींचा फायदा घेऊन काढली जात होती.

advertisement

प्रवाशांची मोठी लूट

हे आरोपी प्रवाशांना तत्काळ तिकीट मिळवून देण्याच्या बहाण्याने जाळ्यात ओढायचे आणि मूळ किमतीपेक्षा कितीतरी पटीने अधिक पैसे उकळायचे. रेल्वे स्थानकावरच उभं राहून हा काळाबाजार बिनधास्तपणे सुरू होता. या कारवाईनंतर आता रेल्वे प्रशासनातील किंवा स्थानिक स्तरावरील कोणाचे या आरोपींना पाठबळ होते का, याचा तपास रेल्वे सुरक्षा दल (RPF) करत आहे.

advertisement

सामान्य प्रवाशांचे सवाल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Tata आता करणार मार्केट जाम, आणली 468 किमी मायलेजदार SUV; किंमतही 6 लाखांपासून
सर्व पहा

या कारवाईमुळे एक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे की, जर एजंट काही मिनिटांत तिकीटं बुक करू शकतात, तर सामान्य प्रवाशांची वेबसाईट नेमकी त्याच वेळी स्लो का होते? रेल्वेने आता अशा 'ब्लॅक बुकिंग' करणाऱ्या एजंटांविरुद्ध मोहीम तीव्र केली असून वाठारमधील या कारवाईने दलालांचे धाबे दणाणले आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रेल्वेची 'तत्काळ' तिकीटं काढून स्टेशनवर उभे राहायचे अन्...; 'ते' दृश्य पाहून अधिकारीही चक्रावले, दोघं ताब्यात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल