रेल्वेमध्ये 10वी पास तरुणांना अप्रेंटिसशिपसाठी सुवर्णसंधी, कसा करायचा अर्ज?
हवामान विभागाने पुढील तीन तासांमधील पावसाबद्दलची अपडेट शेअर केली आहे. पुढच्या तीन तासांसाठी पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. शिवाय, पुढील तीन तासांमध्ये शहरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना असे आवाहनही हवामान विभागाने केले. पुढील 3 तासात पुणे , सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, बीड या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मध्यम ते जोरदार पाऊस आणि ताशी 30- 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
advertisement
नवरात्र दिवस दुसरा: देवी ब्रह्मचारिणीची पूजा कशी करावी? दुसरी माळ कोणती?
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. मुंबई शहराबद्दल सांगायचे तर, मुंबई शहराला तर, पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. मुंबई महानगर पालिकेने शहर आणि उपनगरातील हवामानाबद्दल सांगितले की, अनेक ठिकाणी ढगाळ आकाश आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. शिवाय, 30- 40 किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्यासह वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.