TRENDING:

माझ्या वडिलांच्या आरोपींना फाशी द्या...भाजप पदाधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी दोन वर्षाच्या लेकाची कलेक्टरला मागणी

Last Updated:

वडिलांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी जणू तो मुकी विनवणीच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे करत होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वर्धा : होळीच्या पूर्वसंध्येला चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील बांबर्डा रेतीघाटावर घडलेल्या थराराने संपूर्ण राज्य हादरले आहे. पुलगाव येथील भाजपचे पदाधिकारी आणि उद्योजक भारत नागपाल यांची करण्यात आलेली निर्घृण हत्या आता केवळ गुन्हा उरला नसून, तो एक राजकीय आणि सामाजिक संघर्षाचा केंद्रबिंदू ठरला आहे. या प्रकरणाचे पडसाद बुधवारी थेट विधानसभेत उमटले, जिथे आमदार राजेश बकाने यांनी या संपूर्ण हत्याकांडाची 'सीआयडी' (CID) चौकशी करण्याची आक्रमक मागणी केली.
News18
News18
advertisement

वर्धा शहरात आज काढण्यात आलेला मूक मोर्चा पाहून उपस्थित प्रत्येक नागरिकाचे डोळे पाणावले. या मोर्चाचे सर्वात हृदयद्रावक दृश्य म्हणजे भारत नागपाल यांचा अवघा दोन वर्षांचा चिमुकला मुलगा वेदराज. आपल्या वडिलांच्या हत्येचा अर्थही न समजणाऱ्या वयातील हा बालक, हातात "माझ्या बाबांना न्याय द्या" असा फलक घेऊन मोर्चाच्या अग्रभागी होता. आपल्या वडिलांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी जणू तो मुकी विनवणीच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे करत होता.

advertisement

रेती घाटावरील पूर्वनियोजित कट

भारत नागपाल हे पुलगाव येथील प्रतिष्ठित उद्योजक आणि भाजपचे पदाधिकारी होते. वाळू घाटावर त्यांचा कट रचून खून करण्यात आला. या प्रकरणात वरोरा पोलिसांनी आतापर्यंत 12 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत, मात्र मुख्य सूत्रधार आणि इतर आरोपी अद्यापही मोकाटच आहेत. भाजप वर्तुळात या घटनेमुळे प्रचंड अस्वस्थता असून, हे 'गँगवॉर' की राजकीय हत्या? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नामदेव मठ येथून निघालेल्या या मोर्चात पंजाबी समाज, महिला आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.

advertisement

आंदोलकांनी काय मागण्या केल्या?

  • आरोपींना थेट फाशीची शिक्षा व्हावी.
  • प्रकरणाचा तपास तातडीने सीआयडी कडे सोपवण्यात यावा.
  • खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्वरित न्याय मिळावा.

राजकीय वर्तुळात खळबळ

आमदार राजेश बकाने यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केल्याने सरकारवर दबाव वाढला आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्याची अशा प्रकारे हत्या होणे हे कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे आहेत, अशी टीका होत आहे. नागपाल यांचे बंधू दिनेश आणि राम यांच्यासह हजारो नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन आपल्या भावनांना वाट करून दिली. आता सरकार यावर काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
इस्त्रायल-इराण युद्धाचा महाराष्ट्राच्या द्राक्ष पंढरीला फटका, 700 कंटेनर अडकले!
सर्व पहा

सीआयडी कार्यालयाबाहेर रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांचा राडा;अधिकाऱ्यांसोबत झाली बाचाबाची, नेमकं काय घडलं? 

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
माझ्या वडिलांच्या आरोपींना फाशी द्या...भाजप पदाधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी दोन वर्षाच्या लेकाची कलेक्टरला मागणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल