TRENDING:

मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी भानगडी केल्या, मी पुरावे देतो, मलाही माणसं भेटली, विखेंचा हल्लाबोल

Last Updated:

दिल्लीत इंडिया आघाडीच्या निवडणूक आयोगाच्या आंदोलनाविरोधात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सहभाग नोंदवला. पवार यांचे आंदोलनात सहभागी होणे विखे पाटील यांना रुचले नाही. त्यामुळे त्यांनी शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बालाजी निरफळ, प्रतिनिधी, धाराशिव : जेष्ठता वयाने येत नाही, शरद पवार ज्येष्ठ नाहीत कारण ते राज्यात असताना त्यांनी अनेक भानगडी केल्या परंतु आता निवडणूक आयोगाचे पारदर्शी काम त्यांना बघवत नाही. म्हणून त्यांना आता भानगडी आठवायला लागल्या आहेत, अशा शब्दात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
शरद पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील
शरद पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील
advertisement

दिल्लीत इंडिया आघाडीच्या निवडणूक आयोगाच्या आंदोलनाविरोधात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सहभाग नोंदवला. तसेच माध्यमांना प्रतिक्रिया देताना निवडणूक आयोगावर त्यांनी टीका केली. पवार यांचे आंदोलनात सहभागी होणे विखे पाटील यांना रुचले नाही. त्यामुळे त्यांनी शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली.

शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना अनेक भानगडी केल्या

शरद पवार हे ज्येष्ठ नेते नाहीत. त्यांनी जेष्ठता सोडून दिली आहे. माणूस वयाने ज्येष्ठ होत नसतो. शरद पवार आत्ता निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्हे उपस्थित करत आहेत. तेच शरद पवार हे मतपेट्या बनत असताना अनेक धांदली करत होते. त्यांनी मुख्यमंत्री असताना अनेक भानगडी केल्या आहेत. किती अधिकाऱ्यांना त्यांनी प्रमोशन दिली? केवळ त्यांनाच माणसे भेटली नाही तर त्या काळात मलाही माणसे भेटत होती. हवी तर मी माहिती आणि पुरावे देऊ शकतो, असे म्हणत विखे पाटलांनी शरद पवार यांना लक्ष्य केले.

advertisement

शरद पवार हे कायम भानगडी करत असतात. त्यामुळे आताही सगळं चाललंय ते भानगडीतूनच चाललंय, असा त्यांचा समज असावा, असा खोचक टोला लगावत शरद पवार यांच्या निवडणूक आयोगाच्या विरोधातील आंदोलनाचा विखे पाटील यांनी समाचार घेतला.

इंडिया आघाडीचे दिल्लीत आंदोलन

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल करीत मतचोरीचा गंभीर आरोप करून इंडिया आघाडीने राजधानी नवी दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढला. परंतु हा मोर्चा संसदेवर जाऊ नये, यासाठी पोलीस कामाला लागले. त्यांनी अर्ध्यातूनच राहुल गांधी आणि इतर नेत्यांना ताब्यात घेऊन मोर्चा दडपण्याचा प्रयत्न केला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी भानगडी केल्या, मी पुरावे देतो, मलाही माणसं भेटली, विखेंचा हल्लाबोल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल