TRENDING:

लाल रंगाच्या संविधानावरुन फडणवीसांची टीका, राहुल गांधींचे दिल्लीतून प्रत्युत्तर

Last Updated:

लाल रंगाच्या संविधानावरून फडणवील यांनी केलेल्या टीकेला राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : "राहुल गांधी यांच्या हातात लाल रंगाचे संविधान आहे. ते प्रत्येक सभांमधून लाल रंगाचे संविधान दाखवत आहेत. त्यांच्या आजूबाजूला शहरी नक्षलवादी असतात. ते कट्टर डाव्या विचारांकडे झुकलेले आहेत, याचेच हे निदर्शक आहे", अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या टीकेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
राहुल गांधी आणि देवेंद्र फडणवीस
राहुल गांधी आणि देवेंद्र फडणवीस
advertisement

महाराष्ट्राच्या माजी भाजप मुख्यमंत्र्यांच्या मते बाबासाहेबांचे संविधान दाखवून जात जनगणनेसाठी आवाज उठवणे ही नक्षलवादी संकल्पना आहे. भाजपची ही विचारसरणी म्हणजे महाराष्ट्राच्या राज्यघटनेचे निर्माते डॉ. भीमराव आंबेडकर यांचा अपमान असल्याचे प्रत्युत्तर राहुल गांधी यांनी दिले आहे.

भाजपकडून बाबासाहेबांचा झालेला अपमान महाराष्ट्रातील जनता कदापि विसरणार नाही

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने संविधानासाठी लढून महाविकास आघाडीला मोठा विजय मिळवून दिला. महाराष्ट्रातील जनता भाजपकडून झालेला बाबासाहेबांचा अपमान सहन करणार नाही. महाराष्ट्रातील जनता काँग्रेस आणि महाविकास आघाडीसोबत आपल्या संविधानावरील प्रत्येक हल्ल्याला पूर्ण ताकदीने उत्तर देऊन त्याचे रक्षण करतील, असे सांगून जातनिहाय जनगणना होणार हे माझ्याकडून लिहून घ्या, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

advertisement

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत शहरी नक्षलवादी तसेच अनेक डाव्या विचारांच्या कट्टर संघटना होत्या. या मंडळींच्या माध्यमातून राहुल गांधी देशात अराजक पसरवीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान म्हटले की निळ्या रंगाचे स्मरण होत असताना राहुल गांधी हे लाल रंगाचे पुस्तक हातात घेऊन काय सुचवित आहेत हे आता स्पष्ट होऊ लागलेले आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं डोकं लावलं, डाळिंबीच्या बागेत पैशाचं पीक, अर्ध्या एकरात 2 लाखांचं...
सर्व पहा

शहरी नक्षलवाद म्हणजे लोकांची मने कलुषीत करण्याचा प्रकार आहे. त्यांच्यामध्ये अराजकतेचे रोपण निर्माण करायचे जेणेकरून देशातील संस्था यंत्रणा यावरून त्यांचा विश्वास उडेल, असा गंभीर आरोप फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर केला.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लाल रंगाच्या संविधानावरुन फडणवीसांची टीका, राहुल गांधींचे दिल्लीतून प्रत्युत्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल