TRENDING:

Pradnya Rajeev Satav: राहुल गांधींच्या विश्वासू दिवंगत सहकाऱ्याची पत्नी, आता भाजपात करणार प्रवेश, कोण आहेत आमदार प्रज्ञा सातव?

Last Updated:

Pradnya Rajeev Satav : प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित मानला जात असून, लवकरच त्या अधिकृतपणे भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

advertisement
मुंबई : काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची चिन्हे असून, दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित मानला जात असून, लवकरच त्या अधिकृतपणे भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. हा प्रवेश प्रत्यक्षात घडल्यास काँग्रेससाठी तो मोठा राजकीय धक्का ठरणार आहे.
राहुल गांधींच्या विश्वासू दिवंगत सहकाऱ्याची पत्नी,  आता भाजपात करणार प्रवेश, कोण आहेत आमदार प्रज्ञा सातव?
राहुल गांधींच्या विश्वासू दिवंगत सहकाऱ्याची पत्नी, आता भाजपात करणार प्रवेश, कोण आहेत आमदार प्रज्ञा सातव?
advertisement

हिंगोली जिल्ह्यात सध्या मोठ्या राजकीय हालचाली सुरू असून, काँग्रेसचा एक प्रभावी चेहरा भाजपच्या संपर्कात आल्याची चर्चा आहे. पुढील काही दिवसांत संबंधित नेत्यासह कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर संबंधित नेत्याने आपल्या काही मोजक्या, विश्वासू कार्यकर्त्यांना तातडीने मुंबईत येण्याचे संदेश दिल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. ही व्यक्ती आमदार डॉ. प्रज्ञा सातव असल्याचे बोलले जात आहे.  प्रज्ञा सातव यांच्याकडे विधान परिषद आमदारकीचा २०३० पर्यंतचा कार्यकाळ आहे. भाजप प्रवेशाआधीच त्या आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले जात आहे.

advertisement

कोण आहेत डॉ. प्रज्ञा सातव?

गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे असलेल्या राजीव सातव यांना २०२१ मध्ये कोरोनाची लागण झाली होती. उपचार सुरू असतानाच आजारपणामुळे निधन झालं. प्रज्ञा सातव या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष आहेत. सध्या विधान परिषदेच्या आमदार आहेत. काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर २०२१ साली विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली होती.

advertisement

राजीव सातव हे २०१४ ते २०१९ दरम्यान हिंगोलीचे खासदार होते. २०१९ नंतर काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर संधी दिली होती. २०१७ मध्ये गुजरात निवडणुकीची जबाबदारी काँग्रेसने सातव यांना दिली होती. त्यावेळी काँग्रेसने दमदार कामगिरी करत भाजपच्या नाकी नऊ आणलं होतं. भाजपला काठावरचं बहुमत मिळालं होतं. राजीव सातव यांनी काँग्रेस पक्षात राष्ट्रीय स्तरावर स्वत:चे स्थान निर्माण केले होते. ते राहुल गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जात होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा उलथापालथ, मंगळवारी कांदा आणि मक्याला किती मिळाला भाव?
सर्व पहा

प्रज्ञा सातव या पहिल्यांदा २०२१ मध्ये पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर निवडून आल्या. २०३० पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे. सातव कुटुंब हे काँग्रेसच्या विचारांचे घराणं समजलं जातं. मात्र, प्रज्ञा सातव या भाजपात प्रवेश करत असल्याने काँग्रेसला मोठा धक्का असल्याचे समजलं जात आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pradnya Rajeev Satav: राहुल गांधींच्या विश्वासू दिवंगत सहकाऱ्याची पत्नी, आता भाजपात करणार प्रवेश, कोण आहेत आमदार प्रज्ञा सातव?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल