रायगड जिल्हा पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवॉसेना यांच्यात नाराजी नाट्य रंगले आहे. रायगडच्या पालकमंत्री पदी अदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर भरत गोगावले यांच्यासह शिवसेनेचे रायगडमधील आमदार आक्रमक झाले होते. रायगडात शिवसेनेचे अधिक आमदार असल्याने आपल्या पक्षाकडे जिल्ह्याचे पालकमंत्री पद असावे अशी मागणी भरत गोगावले यांनी केली होती. गोगावले यांनी थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला होता. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दालनात गेला होता. चार दिवसांपुर्वी मंत्री भरत गोगावले यांनी अजित पवारांची भेट घेतली. त्यावेळी दोन दिवसात तुम्हाला गोड बातमी मिळेल असे गोगावले यांनी सांगितले.
advertisement
अल्टिमेटम संपला, भरत गोगावलेंनी काय म्हटले?
मंत्री भरत गोगावले यांनी रायगडाच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीवरून दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. दोन दिवस होऊन गेलेत अद्याप निर्णय झालेला नाही. रत्नागिरीत बोलताना भरत गोगावले यांनी सांगितले की, मुख्यमंत्री दोन दिवस हे दिल्लीत होते. त्यामुळे निर्णयाबाबत आणखी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. मात्र, पालकमंत्री पद आपल्याच मिळणार असल्याचा विश्वास भरत गोगावले यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी आहे. त्यामुळे निर्णय आपल्याच बाजूने लागणार असून पालकमंत्री पदाचे काम प्रगतीपदावर असल्याचे वक्तव्य भरत गोगावले यांनी केले.
