आता रायगडच्या राजकारणात पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळतोय. तटकरे यांना आव्हान देणारे शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी आता रायगडमध्ये मोठी खेळली आहे. रायगड मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे श्रीवर्धन मतदार संघाचे उमेदवार राहिलेले अनिल नवगणे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी ही घोषणा केली आहे. नवगणे यांनी अदिती तटकरेंविरोधात निवडणूक लढवली होती.
advertisement
भरत गोगावलेंची घोषणा...
आज म्हसळा येथे रविप्रभा संस्थे मार्फत गुणगौरव सोहळा आयोजित करण्याचा आला होता. यावेळी मंत्री भरत गोगावले आणि अनिल नवगणे हे निवडणुकांनंतर प्रथमच एका व्यासपीठावर आले होते. अनिल नवगणे हे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख होते. मात्र विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी कारवाया केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिस्तभंगाची कारवाई केली. त्यामुळे अनिल नवगणे यांची पक्षातून हकलपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर श्रीवर्धन मतदार संघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून निवडणुक लढवली होती. नवगणे यांच्या प्रचारासाठी स्वतः शरद पवारांनी म्हसळा येथे जाहिर सभा घेतली होती. मात्र, त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला.
भरतशेठचा डाव यशस्वी होणार?
अनिल नवगणे यांचा श्रीवर्धन मतदार संघात दांडगा अनुभव आहे. आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागू शकतात. या पार्श्भूमीवर नवगणे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश हा राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे भरत गोगावले हे नवगणेचा पक्षप्रवेश घेत सुनील तटकरे यांना शह देण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे.
