रायगड जिल्ह्याच्या सामान्य प्रशासन विभागामध्ये रायगड जिल्हा परिषद, कुंटेबाग, प्रशासकीय इमारत, अलिबाग, जिल्हा रायगड, 402201 या ठिकाणी अर्जदारांना अर्ज दाखल करायचा आहे. अर्जदारांना 30 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर या काळामध्ये अर्ज सादर करण्यासाठी मुदत आहे. 13 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, सार्वजनिक सुट्टी आणि रविवार सोडून कार्यालयीन कामकाजाच्या काळामध्ये अर्जदार अर्ज करून शकणार आहेत. प्रत्यक्ष येऊन किंवा पोस्टाच्या माध्यमातून अर्जदार अर्ज करू शकणार आहेत. सोशल मिडिया मॅनेजर पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक आर्हता आणि अटी- शर्ती सुद्धा नमूद करण्यात आल्या आहेत.
advertisement
रायगड जिल्हा परिषदेमध्ये सोशल मिडिया मॅनेजर पदासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा आणि मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रम ५०टक्के पेक्षा अधिक टक्केवारीसह उत्तीर्ण होऊन पुर्ण केलेला असावा, अशी शैक्षणिक आर्हता आहे. अर्जदाराने जिल्हास्तरावरील "अ" व "ब" दर्जाच्या वृत्तपत्रामध्ये पाच वर्ष काम केल्याचा अनुभव असावा. यामध्ये किमान तीन वर्ष अर्जदाराने "अ" दर्जाच्या वृत्तपत्रात काम केलेले असावे. कोणत्याही संस्थेकडुन सामजिक कार्याकर्ता प्रशिक्षण घेऊन सामाजिक कार्यकर्ता म्हणुन समाजसेवेचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा परिषदेने ठरवून दिलेल्या मासिक मेहनताना रक्कम रू. २००००/- (अक्षरी र.रू. वीस हजार मात्र) प्रमाणे काम करणे अर्जदारास बंधनकारक राहिल.