पण २० वर्षानंतर शिवसेना भवनावर येताच राज ठाकरे भावुक झाले. त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. २० वर्षानंतर आपण जेलमधून सुटून आल्यासारखं वाटत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी १९७७ सालच्या आठवणी देखील सांगितल्या.
शिवसेना भवनावर पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले, माझे मित्र संजय राऊत यांनी वारंवार उल्लेख केला की, २० वर्षानंतर राज ठाकरे शिवसेना भवनात आले. पण मला खरं तर २० वर्षानंतर सुटून आल्यासारखं वाटतंय. २० वर्षे जेलमध्ये होतो, आता पहिल्यांदाच सुटून आलेत, आपण त्यांचं स्वागत करूयात, असं वाटत आहे.
advertisement
आज खूप वर्षानंतर मी शिवसेना भवनात आलो. नवीन शिवसेना भवन पहिल्यांदा बघतोय. माझ्या मनात कायम कोरल्या गेलेल्या सगळ्या आठवणी जुन्या शिवसेना भवनातल्या आहेत. आता कुठे काय होतंय, हेच मला समजत नाहीये. पण जुन्या शिवसेना भावनातील आठवणी खूप रोमांचकारी आणि आनंददायी, अशा आहेत. तुमच्यासोबत बसलो तर शिवसेना भवनातल्या अनेक आठवणी सांगता येतील. १९७७ साली शिवसेना भवन झालं. तेव्हाच जनता पक्षाचं सरकार स्थापन आलं होतं. तिकडे सभा आटोपल्यानंतर शिवसेना भवनावर दगडफेक झाली होती. तेव्हा काय काय झालं. तेव्हापासूनच्या जुन्या आठवणी आहेत. त्यात मी आता रमत नाही,
आज इथं शिवशाहीचा शिवशक्तीचा शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादीचा काँग्रेसचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित करत आहोत. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी जाहीरनाम्यातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेतच. आता त्यावर पुन्हा चर्चा करत नाही. पण आपण याबाबत विचार करावा, असंही राज ठाकरे म्हणाले.
