TRENDING:

MNS MahaVikas Aghadi: महाविकास आघाडीत पहिल्यांदाच मनसेची एन्ट्री, महायुतीला आव्हान! कुठं झाली अधिकृत घोषणा?

Last Updated:

MNS Congress Alliance: मुंबई महापालिकेत काँग्रेसने मनसेला विरोध केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील समीकरणांवर परिणाम होणार का, याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे महत्त्वाची घडामोड घडली आहे.

advertisement
महाविकास आघाडीत पहिल्यांदाच मनसेची एन्ट्री, महायुतीला आव्हान!  कुठं झाली अधिकृत घोषणा?
महाविकास आघाडीत पहिल्यांदाच मनसेची एन्ट्री, महायुतीला आव्हान! कुठं झाली अधिकृत घोषणा?
advertisement

Maharashtra Local Body Election: आगामी मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत. राज ठाकरे यांच्या मनसेची महाविकास आघाडीत एन्ट्री होणार का, याची चर्चा सुरू आहे. मुंबई महापालिकेत काँग्रेसने मनसेला विरोध केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील समीकरणांवर परिणाम होणार का, याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे महत्त्वाची घडामोड घडली आहे. मनसेची आता महाविकास आघाडीमध्ये एन्ट्री झाली असून त्याची अधिकृत घोषणा झाली आहे.

advertisement

ग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने एकत्र येत महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या आघाडीला वंचित बहुजन आघाडी आणि समाजवादी पक्षानेही उघड पाठिंबा जाहीर केला. याच आघाडीत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एन्ट्री झाली आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत मनसे आणि काँग्रेस एकत्र असणार आहेत. स्थानिक काँग्रेस नेत्यांनी मनसेला हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे महायुतीसमोर सोलापूरमध्ये एकत्रित आणि आक्रमक विरोधकांचे तगडे आव्हान उभे राहण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

advertisement

महानगरपालिका निवडणुकीसाठीची भूमिका निश्चित करण्यासाठी शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे सोमवारी सोलापूरच्या दौऱ्यावर होते. शासकीय विश्रामगृहात खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख पक्षांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीतच औपचारिकरीत्यामहाविकास आघाडी” जाहीर करण्यात आली.

advertisement

बैठकीला काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश यलगुलवार, शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष महेश गादेकर, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, जिल्हाप्रमुख अजय दासरी, धनंजय डिकोळे, गणेश वानकर, संतोष पाटील यांच्यासह महिला आघाडीच्या प्रमुख प्रिया बसवंती आणि अमिता जगदाळे उपस्थित होते. मनसेचे जिल्हाप्रमुख विनायक महिंद्रकर आणि माकपचे अॅड. अनिल वासम हेदेखील चर्चेत सहभागी झाले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याचे दर स्थिर, कांद्यामध्ये पुन्हा घसरण, सोयाबीनला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
MNS MahaVikas Aghadi: महाविकास आघाडीत पहिल्यांदाच मनसेची एन्ट्री, महायुतीला आव्हान! कुठं झाली अधिकृत घोषणा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल