पालघर मधील मनसेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मनसैनिकांना गुढीपाडवा मेळाव्यासाठी आवाहन करणाऱ्या बॅनरवरील मनसे नेते अविनाश जाधव यांच्या फोटोला काळं फासण्यात आले आहे. पालघरच्या बोईसर मधील ओसवाल परिसरात लागलेल्या बॅनरवरील फोटोला काळं फासण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
अविनाश जाधव यांच्या फोटोला पालघरमधील मनसे पदाधिकाऱ्यांनी काळ फासल्याची माहिती समोर आली आहे. मनसे नेते अविनाश जाधव आणि पालघर मधील मनसैनिकांमध्ये असलेला वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. अविनाश जाधव यांच्या कार्यपद्धतीबाबत यापूर्वी स्थानिक मनसैनिकांनी आक्षेप घेतले होते. मात्र, स्थानिक मनसैनिकांमध्ये जाधवांबद्दल असलेला रोष अद्याप कमी झाला नसल्याची चर्चा रंगली आहे.
advertisement
राज ठाकरे यांच्या भाषणाकडे लक्ष...
राज ठाकरे यांनी पक्षात संघटनात्मक पातळीवर बदल करण्यास सुरुवात केली आहे. मागील विधानसभा निवडणुकीतही पक्षाला अपयशाला सामोरे जावे लागले. त्यानंतर पुन्हा भरारी घेण्यासाठी मनसेने आता कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कोणती घोषणा करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
