TRENDING:

Raj Thackeray: गाफील राहू नका, आतापासूनच...!" बीएमसीच्या निकालानंतर राज ठाकरेंचा 'ॲक्शन प्लॅन, पदाधिकाऱ्यांना कोणते आदेश?

Last Updated:

Raj Thackeray: मुंबई महापालिका आणि इतर महापालिका निवडणुकीतील अपयशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता पुढील निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबई महापालिका आणि इतर महापालिका निवडणुकीतील अपयशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता पुढील निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांना त्यांनी आदेश देत आगामी २०२९ च्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
गाफील राहू नका, आतापासूनच...!" बीएमसीच्या निकालानंतर राज ठाकरेंचा 'ॲक्शन प्लॅन, पदाधिकाऱ्यांना कोणते आदेश?
गाफील राहू नका, आतापासूनच...!" बीएमसीच्या निकालानंतर राज ठाकरेंचा 'ॲक्शन प्लॅन, पदाधिकाऱ्यांना कोणते आदेश?
advertisement

मुंबईतील पक्षाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यासोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत राज ठाकरेंनी संघटन बांधणीबाबत अत्यंत कडक आणि महत्त्वाचे आदेश दिले आहेत. निवडणुकांना वेळ असला तरी, गाफील न राहता घराघरात पक्ष पोहोचवण्यासाठी राज ठाकरेंनी नव्या रणनीतीवर भर दिला आहे.

प्रत्येक विभागातील ताकद तपासणार

राज ठाकरेंनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांना प्रत्येक विभागाचा सखोल आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने काही मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे.

advertisement

प्रत्येक विभागातील सक्रिय पदाधिकाऱ्यांची संख्या किती आहे, याचा अचूक डेटा गोळा करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत.

पक्षाची खरी ताकद असलेल्या तरुण कार्यकर्त्यांची फळी आणि महिला कार्यकर्त्यांच्या सहभागाबाबत सविस्तर माहिती मागवण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

विद्यमान पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कार्यपद्धती कशी आहे? ते लोकांपर्यंत पोहोचत आहेत का? याचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

advertisement

रिक्त जागा भरण्यावर लक्ष

मुंबईतील ज्या विभागांमध्ये किंवा प्रभागांमध्ये पक्षाची पदे रिक्त आहेत, तिथे तातडीने सक्षम नियुक्त्या करण्याच्या सूचना राज ठाकरेंनी दिल्या आहेत. "२०२९ ला सत्तेचे समीकरण जुळवायचे असेल, तर पाया मजबूत असणे गरजेचे आहे," असा संदेश त्यांनी या बैठकीतून दिला आहे.

कार्यकर्त्यांना 'ॲक्शन मोड'मध्ये येण्याचे संकेत

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव? असं करा कीड व्यवस्थापन, Video
सर्व पहा

राज ठाकरे यांच्या या आदेशामुळे मनसेचे मुंबईतील दिग्गज नेते आणि पदाधिकारी आता मैदानात जोमाने उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटासोबत युती केल्यानंतरही राज यांच्या मनसेला ६ जागांवर विजय मिळाला. तर काही जागांवर निसटता पराभव स्वीकारवा लागला होता.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray: गाफील राहू नका, आतापासूनच...!" बीएमसीच्या निकालानंतर राज ठाकरेंचा 'ॲक्शन प्लॅन, पदाधिकाऱ्यांना कोणते आदेश?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल