पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील राजगुरूनगर शहरात मुख्यालय असणाऱ्या राजगुरूनगर सहकारी बँकेची आज वार्षिक सर्वसाधारण सभा होती. सभा सुरू झाल्यानंतर बँकेच्या व्यवस्थापकांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय घेतले. त्यावर साधक बाधक चर्चा झाली. विषय पत्रिकेवरील महत्वाचे विषय संपल्यानंतर एनवेळच्या विषयामध्ये सभासदांना बोलण्यास व प्रश्न विचारण्यास संधी देण्यात आली होती. यावेळी संचालकांना प्रश्न विचारण्यावरून सभासदांमध्ये वादविवाद झाला.
advertisement
संचालक मंडळाला प्रश्न विचारत असताना सभासदांमध्ये जोरदार हाणामारी झाली. प्रश्न विचारण्यावरुन वाद झाल्याने एका सभासदाने दुसऱ्या सभासदाच्या डोक्यात माईक मारला. बाजार समितीचे संचालक रेवनाथ थिंगळे यांच्या डोक्यात माईक मारल्याचा प्रकार घडला. त्यामुळे वातावरण अजून चिघळले.
यावेळी रेवननाथ थिंगळे यांनी सभेतच मारहाणीचा निषेध नोंदवला. वार्षिक सभेत सुरू असलेला गोंधळ शांत करण्यासाठी संचालक मंडळाने व इतर सभासदांनी प्रयत्न केले. काही वेळात वाद थांबला, वातावरण शांत झाले. त्यानंतर राजगुरुनगर सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा पार पडली.