TRENDING:

लेकीची ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदाची तयारी, बापाचा भाजप जिल्हाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा

Last Updated:

राजेश सावंत यांची लेक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून संभाव्य नगराध्यक्षपदाची उमेदवार असल्याने नैतिकता पाळून राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राजेश जाधव, प्रतिनिधी, रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा स्वीकारला नसल्याचे समजते. त्यांच्या राजीनाम्यामागे मुलीच्या राजकीय कारकीर्दीचे कारण असल्याचे कळते आहे.
राजेश सावंत
राजेश सावंत
advertisement

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून २४६ नगर परिषद आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी होणार आहे. तत्पूर्वी युती आघाड्यांच्या चर्चा अंतिम टप्प्यात असून असून राजकीय नेते आगामी राजकारणातील संधी लक्षात घेऊन पुढील निर्णय घेत आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढण्याचे संकेत खुद्द मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. दुसरीकडे राजेश सावंत यांची लेक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून संभाव्य नगराध्यक्षपदाची उमेदवार असल्याने नैतिकता पाळून आपण राजीनामा देत असल्याचे राजेश सावंत यांनी सांगितले.

advertisement

...म्हणून मी भाजपच्या बैठकांना उपस्थित राहू शकत नाही

राजेश सावंत यांची लेक शिवानी सावंत माने ही उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांची सून आहे. शिवानी सावंत माने नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असून ती निवडणुकीला उभी राहत असल्यामुळे युतीच्या बैठकीला आपण उपस्थित राहू शकत नाही. जनतेमध्ये गैरसमज निर्माण होऊ नयेत म्हणून आपण राजीनामा देत असल्याचे सावंत म्हणाले.

advertisement

अतिशय चांगले काम करणारे पदाधिकारी, रवींद्र चव्हाण यांच्याकडून कौतुकाची थाप

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पोटासाठी किती दिवस रस्त्यावर नाचायचं? डोळ्यात पाणी आणणारा VIDEO
सर्व पहा

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा स्वीकारला नसल्याचे समजते. परंतु अगदी निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिल्याने भारतीय जनता पक्षात एकच खळबळ उडाली आहे. यावर बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, "राजेश सावंत हे अतिशय चांगले काम करणारे पदाधिकारी आहेत. त्यांची लेक नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहे. पक्षाचे काम करताना कुठेही अडचण नको, लोकांनी काही बोलू नये, त्यामुळे राजेश सावंत यांनी त्यांचा राजीनामा माझ्याकडे दिला आहे. मी आणि वरिष्ठ नेते यावर विचार करून निर्णय घेऊ"

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लेकीची ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदाची तयारी, बापाचा भाजप जिल्हाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल