खरं तर नाताळ आणि नववर्षानिमित्त मिळालेल्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटकांनी कोकणाची वाट धरली आहे. अशाच प्रकारे मुंबईच्या पवई परिसरात राहणारे मिथ्या कुटुंबिय पर्यटनासाठी कोकणात दाखल झाले होते. यावेळी गुहागरच्या समुद्रात पोहण्याचा आनंद घेत असताना मिथ्या कुटुंबातील तिघे जण बुडाल्याची घटना घडली होती.आज दुपारी 1 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक जीवरक्षकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबवले होते. या बचावकार्याच्या माध्यमातून एका महिलेला आणि तिच्या 14 वर्षाच्या मुलाला वाचवण्यात यश आले आहे. तर अथक परिश्रमानंतरही अमोलला वाचण्यात स्थानिकांसह पोलिसांना अपयश आले. त्यामुळे 42 वर्षीय अमोल मुथ्या यांचा या घटनेत दुदैवी मृत्यू झाला आहे.
Location :
Ratnagiri,Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 4:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ratnagiri News : नववर्षाच्या तोंडावर दु:खाचा डोंगर,मुंबईहून गुहागरला गेलेले कुटुंब समुद्रात बुडालं, नेमकं काय घडलं?
