TRENDING:

Ratnagiri: शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या बसला भीषण अपघात, साखरझोपेत असलेल्या 28 प्रवाशांसह बस उलटली

Last Updated:

Ratnagiri Bus Accident: कोकणात सध्या शिमगोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, याच उत्सवासाठी मुंबईहून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांवर काळाने घाला घातला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी रत्नागिरी: कोकणात सध्या शिमगोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, याच उत्सवासाठी मुंबईहून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांवर काळाने घाला घातला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड-धामणंद मार्गावरील एनवरे येथे पहाटेच्या सुमारास एका खासगी आराम बसला भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटली. या अपघातात बसमधील २५ प्रवासी जखमी झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
News18
News18
advertisement

पहाटेच्या सुमारास दुर्घटना

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस मुंबईतील बोरिवली येथून खेडमधील सापिर्ली गावाकडं जात होती. शिमगोत्सवाच्या निमित्तानं ग्रामदेवतेच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी सापिर्ली आणि धामणंद परिसरातील भाविक या बसनं प्रवास करत होते. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही बस एनवरे गावाजवळ आली असताना चालकाचं अचानक बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट खड्ड्यात पलटी झाली.

advertisement

ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी बसमधील बहुतांशी प्रवासी झोपलेले होते. त्यामुळे २८ पैकी २५ प्रवासी जखमी झाले. अपघाताचा आवाज ऐकताच एनवरे येथील स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी अत्यंत तत्परतेनं बचाव कार्य राबवत बसमध्ये अडकलेल्या २८ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं.

जखमींवर उपचार सुरू

या भीषण अपघातात एकूण २५ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र, दोन प्रवासी गंभीर जखमी आहेत. सर्व जखमींना तातडीनं खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी झालेले सर्व प्रवासी मूळचे सापिर्ली-धामणंद गावातील रहिवासी आहेत.

advertisement

शिमगोत्सवाच्या आनंदावर विरजण

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याचं मार्केट हाललं, लिंबू अन् शेवग्यालाही भाव, कुठं मिळाला सर्वाधिक दर?
सर्व पहा

कोकणात सध्या शिमगोत्सवाची धूम सुरू असून ग्रामदेवतेच्या पालख्या घरोघरी जात आहेत. आपल्या लाडक्या देवाला भेटण्यासाठी मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांच्या बसला अपघात झाल्यामुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे. पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ratnagiri: शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या बसला भीषण अपघात, साखरझोपेत असलेल्या 28 प्रवाशांसह बस उलटली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल