TRENDING:

Thane News : भाजपमध्ये मेगाभरती, शरद पवार गटाचा आणखी किल्ला ढासळणार! कुठं होणार राजकीय उलथापालथ?

Last Updated:

BJP vs Sharad Pawar NCP : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने पक्षबांधणीची मोहीम अधिक तीव्र केली आहे. याच अनुषंगाने आज एक मोठा राजकीय घडामोडींचा दिवस ठरला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने पक्षबांधणीची मोहीम अधिक तीव्र केली आहे. याच अनुषंगाने आज एक मोठा राजकीय घडामोडींचा दिवस ठरला आहे. उल्हासनगर महापालिकेत शरद पवार गटाला जोरदार धक्का देत, त्यांच्या गटातील अनेक माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.
Thane News : भाजपमध्ये मेगाभरती, शरद पवार गटाचा आणखी किल्ला ढासळणार! कुठं होणार राजकीय उलथापालथ?
Thane News : भाजपमध्ये मेगाभरती, शरद पवार गटाचा आणखी किल्ला ढासळणार! कुठं होणार राजकीय उलथापालथ?
advertisement

भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश सोहळा आज दुपारी 3 वाजता भाजप प्रदेश कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार गटाचे अनेक महत्त्वाचे माजी नगरसेवक, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी एकमुखाने भाजपात प्रवेश करणार आहेत. यामध्ये पक्षाची मोठी ताकद उल्हासनगर महापालिका क्षेत्रात वाढताना पाहायला मिळणार आहे.

advertisement

या पक्ष प्रवेशामुळे उल्हासनगर परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने जिल्हास्तरावर संघटनात्मक बळकटी करण्याचे धोरण स्वीकारले आहे, त्याला आजचा पक्षप्रवेश महत्त्वपूर्ण बळकटी देणारा ठरणार आहे.

यावेळी प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे.   “भाजप हा कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर उभा राहिलेला पक्ष आहे. आगामी महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकांत भाजपाचा झेंडा अधिक उंच नेण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असं यापूर्वीच भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे .”

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

भाजपात होणाऱ्या या पक्षप्रवेशामुळे उल्हासनगर महापालिकेतील भाजप अधिक बळकट होणार असून, स्थानिक विकासकामांना गती मिळणार असल्याचा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे उल्हासनगरात महापालिका क्षेत्रात मोठी राजकीय उलथापालथ होताना पाहायला मिळत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी यापूर्वी स्पष्ट केलं आहे. विकासाच्या मुद्यावर अनेक जण आमच्या संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले. राज्यभरात भाजपची संघटना विस्तारत असून, येणाऱ्या निवडणुकांसाठी भाजपची भूमिका अधिक निर्णायक ठरणार आहे, हे यामुळे स्पष्ट झाले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thane News : भाजपमध्ये मेगाभरती, शरद पवार गटाचा आणखी किल्ला ढासळणार! कुठं होणार राजकीय उलथापालथ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल