एकनाथ शिंदे यांनी मला नेहमी सांगितले की महायुतीतील पक्षावर बोलायचे नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार मी पक्षावर न बोलता प्रवृ्त्तीवर बोलत राहिलो. तसेच एकनाथ शिंदे यांनी माझ्यासोबत परवा चर्चा केली आणि आम्ही मार्ग काढला, असे एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या भेटीनंतर रविंद्र धंगेकर यांनी सांगितले.
शिंदेसाहेबांनी मला ओरडावं, रागवावं यासाठी काही यंत्रणा काम करताहेत
advertisement
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावरील टीकेसंदर्भात विचारले असता, शाह यांच्यावर मी कोणतीही टीका केलेली नाही. आजही मला एकनाथ शिंदे यांनी त्यासंबंधी विचारणा केल्यावर मी टीकेचा इन्कार केला. मात्र काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने भांडवल करण्याचा प्रयत्न करतात. शिंदे साहेबांनी मला काहीतरी बोलावे, चिडावे, रागवावे यासाठी काही लोकांचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप करीत भारतीय जनता पक्षाचे नाव घेणे त्यांनी टाळले.
आमच्या रक्तात शिवसेना, उभारलेला लढा पुढे नेऊ
मी गेल्या ३५ वर्षांपासून राजकारणात आहे. कुणावर काय बोलायचे आणि काय बोलू नये हे मला चांगले कळते. आमच्या रक्तात शिवसेना आहे. आम्ही उभारलेला लढा सुरूच ठेवू. उद्यापासून तुम्हाला पाहायला मिळेल, असे रविंद्र धंगेकर म्हणाले.
