TRENDING:

SBI मध्ये नोकरभरती, कोणत्याही परीक्षेशिवाय डेप्युटी मॅनेजर पदासाठी भरती; जाणून घ्या सर्व Detail

Last Updated:

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. एसबीआय बँकेमध्ये तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. बँकेमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर रेग्युलर बेस पदासाठी नोकर भरती केली जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. एसबीआय बँकेमध्ये तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. बँकेमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर रेग्युलर बेस पदासाठी नोकर भरती केली जात आहे. अलीकडेच नोकर भरतीची घोषणा करण्यात आली आहे. नोकर भरतीबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया...
News18
News18
advertisement

स्पेशलिस्ट ऑफिसर रेग्युलर बेस (Specialist Officer Regular Base) पदाच्या अंतर्गत डेप्युटी मॅनेजर (इकोनॉमिस्ट) – (Deputy Manager – Economist) पदासाठी नोकरभरती केली जाणार आहे. MMGS-II या ग्रेड अंतर्गत तीन जागांसाठी नोकरभरती होत आहे. 13 ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या नोकर भरतीची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2025 आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड कोणत्याही लेखी परीक्षेविना होणार आहे. मुलाखतीच्या माध्यमातूनच उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

advertisement

शॉर्टलिस्टिंग (Shortlisting), इंटरव्ह्यू (Interview) आणि मेरिट लिस्ट (Merit List) अशा प्रकारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. एसबीआयमधील या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे पुढील पैकी पात्रता असणे आवश्यक आहे. अर्थशास्त्र (Economics) विषयामध्ये अर्जदाराकडे मास्टर्सची डिग्री प्राप्त केलेली असावी. याचसोबत इकोनॉमिमेट्रिक्स (Econometrics) / मॅथेमॅटिकल इकोनॉमिक्स (Mathematical Economics) किंवा फायनान्शियल इकोनॉमिक्स (Financial Economics) मध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.

advertisement

इच्छुक आणि पात्र उमेदवार खालील स्टेप्स फॉलो करून अर्ज करू शकतात-

  • वेबसाइटवर जा: सर्वात आधी sbi.bank.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • करिअर सेक्शन: वेबसाइटवर ‘Careers’ सेक्शनवर क्लिक करा.
  • भरती निवडा: तिथे तुम्हाला ‘Recruitment of Specialist cadre officer on Regular Basis’ वर क्लिक करावे लागेल.
  • नोंदणी/लॉग इन: नवीन उमेदवारांनी रजिस्ट्रेशन करावे आणि त्यानंतर लॉग-इन करावे.
  • advertisement

  • माहिती भरा: नाव, पत्ता आणि सर्व वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा.
  • शुल्क भरा आणि सबमिट करा: अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट आउट काढून ठेवा.
  • टॉप व्हिडीओज

    सर्व पहा
    भाऊबिजेला याच रंगाचे कपडे का टाळावेत? औक्षणाचा शुभ मुहूर्त काय? Video
    सर्व पहा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
SBI मध्ये नोकरभरती, कोणत्याही परीक्षेशिवाय डेप्युटी मॅनेजर पदासाठी भरती; जाणून घ्या सर्व Detail
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल