गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास रोहित आर्याचं एन्काऊंटर करण्यात आलं. मात्र अद्याप त्याच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आलं नाही. मृत्यूनंतर त्याचे हाल सुरू आहेत. आजही त्याच्यावर शवविच्छेदन होणार नाही, अशी माहिती समोर येत आहे.
शवविच्छेदनात नेमका अडथळा काय येतोय?
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी दहा वाजता रोहित आर्यावर शवविच्छेदन करण्यात येणार होतं. सहा डॉक्टरांच्या तज्ज्ञ टीमकडून हे शवविच्छेदन करण्यात येणार होतं. मात्र अद्याप रोहित आर्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अजून सुरू झालं नाही. रोहित आर्याचे कोणीही नातेवाईक न आल्याने शवविच्छेदनाला तांत्रिक अडथळा निर्माण झाला आहे.त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय.
advertisement
मात्र अद्याप रोहित आर्याच्या कुटुंबीयांशी कसलाही संपर्क होत नाही. ते कुठे आहेत? याची काहीच माहिती अद्याप समोर आली नाही. जर रोहित आर्याच्या नातेवाईकांशी संपर्क झाला नाही. किंवा ते शवविच्छेदनासाठी आले नाहीत, तर पोलीस कोर्ट ॲार्डर घेवून शवविच्छेदन करु शकतील. मात्र त्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते. रोहित आर्याचे कुटुंबीय आज आले नाही, तर आज रोहित आर्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होण्याची शक्यता फार कमी असल्याचे वरीष्ठ डॅाक्टरांनी स्पष्ट केलं आहे.
