TRENDING:

दादांच्या अपघाताचे काय काय पुरावे हाताला लागले? रोहित पवार सुनेत्रा पवारांना भेटले, थेट फाईलच हातात ठेवली!

Last Updated:

Rohit Pawar Met Sunetra Pawar: रोहित पवार यांनी शुक्रवारी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घेतली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे सातत्याने पत्रकार परिषद घेऊन अपघातावर संशय व्यक्त करीत आहेत. अजित पवार यांचा घातपात झाला असावा, अशी शंका व्यक्त करीत त्यांनी चौकशीला विलंब करणाऱ्या यंत्रणांना देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. गेल्या तीन आठवड्यापासून त्यांनी चार ते पाच पत्रकार परिषदा घेऊन अजित पवार यांच्या अपघाताच्या संदर्भाने नवनवे दावे केले आहे. या सगळ्याच्या अनुषंगाने ते आपल्याकडील माहिती विविध राजकीय नेतेमंडळींना देऊन अजित पवर यांच्या न्यायासाठी लढा उभारत आहेत. रोहित पवार यांनी शुक्रवारी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घेतली. .
रोहित पवार आणि सुनेत्रा पवार
रोहित पवार आणि सुनेत्रा पवार
advertisement

अजितदादांच्या संशयास्पद विमान अपघाताबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबईत विधान भवनात भेट घेऊन या अपघाताबाबत गोळा केलेली संपूर्ण तपशीलवार कागदपत्रे त्यांना दिली. तसेच अपघाताच्या चौकशीकामी सुरू असलेल्या पाठपुराव्याची माहिती देखील त्यांनी सुनेत्रा पवार यांना दिली.

सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर रोहित पवार म्हणाले...

अजितदादांच्या विमान अपघाताबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी यांची मुंबईत भेट घेऊन या अपघाताशी संबंधित जमा केलेल्या संपूर्ण तपशीलाची आणि चौकशी कामी सुरू असलेल्या पाठपुराव्याची माहिती त्यांना दिली. तसंच या अपघातात अजितदादांसह मृत्यू झालेले जाधव, माळी आणि पाठक कुटुंबियांच्या मागणीसंदर्भातही त्यांच्याशी चर्चा केली, असे रोहित पवार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अपघाताच्या अनुषंगाने त्यांच्याकडे असलेल्या माहितीची कागदपत्रे सुनेत्रा पवार यांना दिली.

advertisement

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, खासदार अजित पवार यांना न्याय मिळावा, यासाठी माध्यमांतून सातत्याने बोलत आहेत. मात्र सरकारी पक्षाकडून चौकशी सुरू आहे, चौकशीअंती न्याय मिळेल, असे सांगितले जात आहे. अशावेळी रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या घेतलेल्या भेटीला महत्त्व प्राप्त होत आहे. रोहित पवार यांचा अपवाद वगळता पवार कुटुंबातून अजित पवार यांच्या अपघातावर फारसे कुणी बोलताना दिसत नाही. सुनेत्रा पवार यावर काय बोलतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

advertisement

advertisement

रोहित पवार यांनी एकनाथ शिंदे यांचीही घेतली भेट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आधी रशिया, मग दिल्ली, पुणेकर योगशची सुवर्ण कामगिरी,Video
सर्व पहा

अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाच्या खासदारांनी हा मुद्दा संसदेत मांडावा, अशी विनंती केली. या अपघाताची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी ते नक्कीच सहकार्य करतील, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दादांच्या अपघाताचे काय काय पुरावे हाताला लागले? रोहित पवार सुनेत्रा पवारांना भेटले, थेट फाईलच हातात ठेवली!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल