TRENDING:

आधी रशिया, मग दिल्ली, पुणेकर योगशची सुवर्ण कामगिरी, कौतुकास्पद भरारी, Video

Last Updated:

Pune News: या स्पर्धेत आशिया खंडातील एकूण 252 स्पर्धक सहभागी झाले होते. पाच देशांमधील या स्पर्धकांमध्ये महाराष्ट्रातील 31 स्पर्धक होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: रशियातील स्पर्धेत दमदार कामगिरीनंतर पिंपरी-चिंचवडच्या पॉवर लिफ्टिंग खेळाडूनं दिल्ली गाजवली आहे. पिंपरी गुरव परिसरात राहणाऱ्या योगेश जांभुळकर यांनी दिल्लीत झालेल्या ‘आशियन पॉवरलिफ्टिंग 2026’ मध्ये 1 सुवर्ण आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली आहे. आशियाई स्तरावरील 75 किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांच्या याच यशाबद्दल लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement

रशियातील यशाची मालिका दिल्लीतही कायम

रशियात चमकदार कामगिरी केल्यानंतर योगेश जांभुळकर यांनी दिल्लीतही आपले यश कायम राखले आहे. 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत झालेल्या आशियन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत त्यांनी मास्टर गटात एक सुवर्ण आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली आहे. या स्पर्धेत भारतासह काही प्रमुख आशियाई देशांनी सहभाग नोंदवला होता.

advertisement

Success Story: नोकरी करायची की व्यवसाय? यज्ञेशनं निर्णय घेतला, आता फेमस ब्रँड अन् लाखात कमाई, Video

महाराष्ट्राच्या विविध भागातील स्पर्धकांनी एकूण 55 सुवर्णपदके पटकावून राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या स्पर्धेत आशिया खंडातील एकूण 252 स्पर्धक सहभागी झाले होते. पाच देशांमधील या स्पर्धकांमध्ये महाराष्ट्रातील 31 स्पर्धक होते. ही स्पर्धा ‘वर्ल्ड रॉ पॉवरलिफ्टिंग फेडरेशन इंडिया’ यांच्याकडून आयोजित करण्यात आली होती.

advertisement

यशाचं रहस्य काय?

योगेश जांभुळकर यांनी सांगितले की, त्यांचे यश कठोर मेहनत, नियमित सराव आणि शिस्तबद्ध आहारामुळे शक्य झाले आहे. ते रोज जिममध्ये अनेक तास सराव करतात आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन घेतात. फक्त शारीरिकच नाही, तर मानसिक तयारीही त्यांनी मोठ्या प्रमाणावर केली आहे, ज्यामुळे मोठ्या स्पर्धांमध्ये दबावाखालीही ते शांत राहून सर्वोत्तम कामगिरी करू शकतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वडील शेतकरी तर आई गृहिणी, संगमनेरच्या धनंजयने मिळवली UPSC मध्ये 529 वी रँक
सर्व पहा

दरम्यान, योगेश सांगतात की, आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यासाठी सातत्य आणि चिकाटी खूप महत्त्वाची आहे. त्यांच्या कामगिरीमुळे पिंपरी-चिंचवडचे नाव आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
आधी रशिया, मग दिल्ली, पुणेकर योगशची सुवर्ण कामगिरी, कौतुकास्पद भरारी, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल