advertisement

T20 World Cup : वानखेडेवर सूर्याची घोडचूक, वर्ल्ड कप हातातून गेलाच होता, कुणाच्याच लक्षात आलं नाही!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाने इंग्लंडवर 7 रननी रोमांचक विजय मिळवला. भारताने दिलेल्या 254 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लडने शेवटच्या ओव्हरपर्यंत झुंज दिली.

वानखेडेवर सूर्याची घोडचूक, वर्ल्ड कप हातातून गेलाच होता, कुणाच्याच लक्षात आलं नाही!
वानखेडेवर सूर्याची घोडचूक, वर्ल्ड कप हातातून गेलाच होता, कुणाच्याच लक्षात आलं नाही!
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाने इंग्लंडवर 7 रननी रोमांचक विजय मिळवला. भारताने दिलेल्या 254 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लडने शेवटच्या ओव्हरपर्यंत झुंज दिली. जेकब बेथलने 48 बॉलमध्ये 218.75 च्या स्ट्राईक रेटने 105 रन केले, ज्यात 8 फोर आणि 7 सिक्सचा समावेश होता. याशिवाय विल जॅक्सने 20 बॉलमध्ये 35 रनची खेळी केली. जेकब बेथलला दुसऱ्या बाजूने कोणाचीच साथ मिळाली नाही, अन्यथा इंग्लंडने मोठा उलटफेर केला असता.
भारताकडून हार्दिक पांड्याला सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या, तर अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. जसप्रीत बुमराहचा भेदक स्पेल टीम इंडियाच्या विजयाचं प्रमुख कारण ठरली. टीम इंडियाच्या इतर बॉलर्सवर आक्रमण होत असताना बुमराहने 4 ओव्हरमध्ये फक्त 33 रन दिल्या. मोक्याच्या क्षणी टाकलेल्या 18 व्या ओव्हरमध्ये बुमराहने फक्त 6 रन दिल्या.
advertisement
या सामन्यामध्ये टीम इंडियाचा 7 रननी विजय झाला असला तरी कर्णधार सूर्यकुमार यादवने या सामन्यात मोठी चूक केली होती, सुदैवाने टीम इंडियाने हा सामना जिंकला अन्यथा ही घोडचूक भलतीच महागात पडली असती. वरुण चक्रवर्तीने या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 16 च्या इकोनॉमी रेटने तब्बल 64 रन दिले. वरुणच्या पहिल्या ओव्हरमध्ये 23 रन, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14, तिसऱ्या ओव्हरमध्ये 14 आणि चौथ्या ओव्हरमध्ये 13 रन दिले.
advertisement
दुसरीकडे अक्षर पटेलने त्याच्या ओव्हरचा कोटा पूर्ण केला नाही. अक्षर पटेलने 3 ओव्हर बॉलिंग केली आणि 11.70 च्या इकोनॉमी रेटने 35 रन दिले. एकीकडे वरुण चक्रवर्तीवर इंग्लंडचे बॅटर आक्रमण करत असताना कर्णधार सूर्यकुमार यादवकडे वरुणला चौथी ओव्हर देण्याऐवजी अक्षर पटेलला आणखी एक ओव्हर द्यायची संधी होती, पण तरीही त्याने अक्षरवर विश्वास दाखवला नाही. एवढंच नाही तर सूर्या अक्षर पटेलला शेवटची ओव्हरही देऊ शकला असता, पण त्याने अक्षरऐवजी शिवम दुबेच्या हातात बॉल दिला. शिवम दुबेने या ओव्हरमध्ये 22 रन दिल्या. जोफ्रा आर्चरने दुबेला 3 सिक्स मारले.
advertisement

फायनलमध्ये वरुणला डच्चू?

या टी-20 वर्ल्ड कपमध्ये वरुण चक्रवर्तीची कामगिरी निराशाजनक झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही वरुण चक्रवर्तीची धुलाई झाली होती, त्यामुळे आता फायनलमध्ये वरुणऐवजी कुलदीप यादवचा विचार टीम इंडिया करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : वानखेडेवर सूर्याची घोडचूक, वर्ल्ड कप हातातून गेलाच होता, कुणाच्याच लक्षात आलं नाही!
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement