महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गेली दोन दिवस निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन मतदार यादीतील घोळ, दुबार मतदान आदी विषयांवर आक्षेप घेतले. जोपर्यंत यंत्रणेची तयारी होत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे ढकला, अशी मागणीही त्यांनी केली. गुरुवारी रोहित पवार यांनी एक पाऊल पुढे टाकत प्रात्याक्षिक दाखवत मतचोरीसाठी आधार कार्डचा वापर कसा होतो, खोटे आधार कार्ड कसे बनवले जाते, मतदार यादीत कसे दोष आहेत हे वेगवेगळ्या मतदारसंघातील उदाहरणे सांगत दाखवून दिले.
advertisement
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा फोटो वापरून आधारकार्ड बनवून दाखवलं
मतदार वगळण्यासाठी फॉर्म 6चा गैरवापर होतोय. विरोधातले मतदार मृत दाखवलेत तर मृत व्यक्तींच्या नावावर मतदान झाले आहे, असा आरोप रोहित पवारांनी केलाय. मतदार यादीतील घोळ दाखवत रोहित पवारांनी निवडणूक आयोगाला सवाल केलेत. यावेळी त्यांनी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा फोटो वापरून आधारकार्ड बनवून दाखवलंय. मतचोरीसाठी आधारकार्डचा वापर केला जातोय, असे सांगतानाच बोगस आधारकार्ड कसं बनवलं जातं हे दाखवण्यासाठी रोहित पवारांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावे आधारकार्ड बनवून, त्यांचा पत्ता पांढरा बंगला कर्जत असे लिहिला, त्यांची जन्मतारीखही लिहिली.
माणसं शोधायला गेल्यावर पत्त्यावर कुणीच नाही
विरोधातील मतदार मयत दाखवण्यात आले. सहा महिन्यात 48 लाख मतदार कसे वाढले? माणसं शोधायला गेल्यावर पत्त्यावर कुणीच नाही. धुळे ग्रामीण मतदार यादीत एकाच पत्त्यावर 4 जुळे मिळून आले. अचानक वाढलेले मतदार कुठून आले, कसे आले याची माहिती निवडणूक आयोगाने द्यायला हवीत. याद्यांमधील घोळ नीट होईपर्यंत निवडणुका का घेता? असा सवाल रोहित पवार यांनी विचारला.