अजितदादांच्या अपघाताला कारणीभूत असल्याचा आरोप असलेल्या VSR कंपनीच्या मालकाच्या मुलगा रोहित सिंगच्या राजस्थानमध्ये झालेल्या लग्नाला आपण उपस्थित होता का? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. जर उपस्थित होता तर त्या लग्नात इतर कोणते नेते आणि कोणत्या पक्षाचे होते, याची माहिती जनतेसमोर द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच याबाबत प्रफुल पटेल यांनी उद्या पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट भूमिका मांडावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
advertisement
रोहित पवार यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?
प्रफुल पटेल जी (माजी केंद्रीयनागरी उड्डाणमंत्री) आपणास विनंती आहे की, अजितदादांच्या अपघाताला / घातपातला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नात आपण गेला होतात का? गेला असालच तर त्या लग्नात इतर कोण नेते होते आणि कुठल्या पक्षाचे होते हे तुम्हाला माहीतच असेल ते आपण लोकांना सांगावं... तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात, हे महाराष्ट्राला दाखवून द्या… उद्या पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण द्याल, ही अपेक्षा..!
अजितदादांना न्याय मिळण्यासाठी रोहित पवारांनी लढा उभारला
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे सातत्याने पत्रकार परिषद घेऊन अपघातावर संशय व्यक्त करीत आहेत. अजित पवार यांचा घातपात झाला असावा, अशी शंका व्यक्त करीत त्यांनी चौकशीला विलंब करणाऱ्या यंत्रणांना देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. गेल्या तीन आठवड्यापासून त्यांनी चार ते पाच पत्रकार परिषदा घेऊन अजित पवार यांच्या अपघाताच्या संदर्भाने नवनवे दावे केले आहे. या सगळ्याच्या अनुषंगाने ते आपल्याकडील माहिती विविध राजकीय नेतेमंडळींना देऊन अजित पवर यांच्या न्यायासाठी लढा उभारत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी राज्यातले सर्वच प्रमुख नेते तसेच देशातलेही वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे.
