महादेव जानकर यांनी म्हटलं की, आईची शप्पथ घेऊन सांगतो, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कधीच होणार नाही. पण पाच मिनिटांसाठी का होईना पण देशाचा पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही.
भूम शहरात रासपचे उमेदवार डॉक्टर राहुल घुले यांच्या प्रचारासठी महादेव जानकर यांनी सभा घेतली. या सभेत बोलताना महादेव जानकर यांनी पंतप्रधान पदाबाबद विधान केलं. तसंच भाजपवरही फोडाफोडीच्या राजकारणावरून टीका केली.
advertisement
महादेव जानकर म्हणाले की, भाजपने पवारांचं घर फोडलं. बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह चोरलं. भाजप ही चालू पार्टी आहे. ते माणसात माणूस आणि पक्षात पक्ष ठेवत नाहीत अशा शब्दात जानकर यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 18, 2024 12:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mahadev Jankar : मुख्यमंत्री कधीच नाही पण 5 मिनिटं तरी पंतप्रधान होईन, जानकरांचं विधान
