नेमकी घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, एक पीकअप व्हॅन यावलच्या दिशेने जात होतं, तर दुसरं पीकअप फैजपूरच्या दिशेने येत होती. फैजपूर परिसरातील पुलावरून जात असताना अचानक एका गाडीचं स्टेरिंग तुटलं. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हे पीकअप समोरून येणाऱ्या दुसऱ्या दोन वाहनांना धडकलं. पीकअपचा वेग जास्त असल्याने या धडकेनंतर संबंधित वाहन पुलाचे कठडे तोडून थेट खाली कोसळलं. या अपघातात पुलाखाली कोसळलेल्या गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
advertisement
स्थानिकांकडून तातडीने मदतकार्य
अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी आणि इतर वाहन चालकांनी घटनास्थळी धाव घेतली. पुलाखाली कोसळलेल्या गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी दाखल झाले. या भीषण अपघातामुळे काही काळ फैजपूर-यावल रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. अपघातग्रस्त वाहनातील चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र यात गाडीचं प्रचंड नुकसान झालं आहे. तसेच पीकअपमध्ये असलेल्या साहित्याचं देखील नुकसान झालं आहे.
