TRENDING:

फलटणच्या महिला डॉक्टरचा तीन वेळा बदलीचा प्रयत्न झाला पण... रुपाली चाकणकर यांची नवी माहिती

Last Updated:

Phaltan Doctor Death Case: फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण दुर्दैवी असल्याचे सांगत उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी यांच्याशी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चर्चा केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सचिन जाधव, प्रतिनिधी, फलटण, सातारा : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. आत्महत्या केलेली डॉक्टर युवती याच रुग्णालयात काम करत होती. त्याच बरोबर या रुग्णालयात काम करत असताना डॉक्टर युवतीला पोलिस विभागाकडून त्रास होत होता. याबाबतची चौकशी करण्यासाठी चाकणकर रुग्णालयात आल्या होत्या. त्यांनी रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर बोलताना आतापर्यंत घटनेतील तपशील माध्यमांसमोर ठेवले.
फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरण
फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरण
advertisement

ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगत सर्व डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केल्याचे चाकणकर यांनी सांगितले. डॉक्टर युवतीने आयसी कमिटीकडे तक्रार केली नव्हती. मात्र पोलीस आणि डॉक्टर यांच्या एकमेकांबद्दल तक्रारी होत्या. आरोपींच्या बाबतीत फिट आणि अनफिट रिपोर्ट देण्यावरून डॉक्टर आणि पोलिसांमध्ये द्वंद्व होते, असे चाकणकर यांनी सांगितले.

फलटणच्या महिला डॉक्टरचा तीन वेळा बदलीचा प्रयत्न झाला पण...

advertisement

आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेने तीन वेळा बदलीच्या बाबतीत विचारणा होऊन देखील फलटणमध्येच थांबण्याचे ठरवले होते. त्यासाठी विशेष ऑर्डर करून बदली थांबवण्यात आली. पोलिसांनी घटनेतील मोबाईलचा सीडीआर काढला आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी डॉक्टर युवती प्रशांत बनकर यांच्या घरी होत्या. यावेळी फोटो काढण्यावरून त्यांच्यात वाद झाल्याचे देखील समोर आला आहे. लवकरात लवकर पीएम रिपोर्ट मिळवावा असे देखील मी सांगितले आहे. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल देखील लवकरात लवकर मिळावा यासाठी मी निर्देश दिले आहेत असे चाकणकर म्हणाल्या.

advertisement

डॉक्टर आणि पोलिसांची एकमेकांविरोधात तक्रार

या वादावादीच्या घटनेत पहिली तक्रार ही डॉक्टर युवतीची आहे. त्यानंतर पोलिसांची डॉक्टरविरोधात तक्रार आहे. याबाबत चौकशी समिती नेमण्यात आली होती. पोलिसांशी बोलताना व्यवस्थित बोलावे असं चौकशी समितीने डॉक्टर महिलेला सांगितलं होतं. त्यानंतर ही केस निकालात काढण्यात आली होती. या घटनेचा तपास पारदर्शी पद्धतीने होईल. राज्य महिला आयोगाचे या तपासाकडे लक्ष असल्याचेही चाकणकर म्हणाल्या.

advertisement

तूर्तास तरी एसआयटीची गरज नाही

डॉक्टर महिलेसोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांशी मी चर्चा केली मात्र त्यांच्याकडून फिट अनफिट त्याचबरोबर इतर दबावाची चर्चा त्यांनी इतरांशी केलेली दिसत नाही. आयसी कमिटीकडे कोणतीही तक्रार नाही. तपास व्यवस्थित सुरू असल्याने एसआयटीची गरज नसल्याचे चाकणकर यांनी सांगितले. गरज वाटली तर एसआयटीची मागणी करू, असेही त्या म्हणाल्या.

आयोगाची अध्यक्षा या नात्याने तपास पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करू

advertisement

घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर चांगले आयुष्य जगण्याचे मुलींची स्वप्ने असतात. परंतु अशा पद्धतीने हत्या किंवा आत्महत्या होत असताना मन विषण्ण होते. घटना घडल्यापासून मी स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक आणि तपास यंत्रणांच्या संपर्कात आहे. आयोगाची अध्यक्षा या नात्याने तपास पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करेल. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालेल. लवकरात लवकर न्याय देण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू.

सध्या तरी खासदार आणि स्वीय सहाय्यकांच्या फोनची माहिती समोर आलेली नाही

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

खासदार आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकाची सगळी चौकशी यामध्ये आम्ही करू. या सगळ्या प्रश्नांचे निरसन होईपर्यंत आणि त्याचे उत्तर मिळेपर्यंत चौकशी होईल. खासदार आणि त्यांचे पीए यांच्या संदर्भातली कुठलीही माहिती आत्तापर्यंतच्या तपासामध्ये तरी समोर आलेली नाही, असेही चाकणकर म्हणाल्या.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
फलटणच्या महिला डॉक्टरचा तीन वेळा बदलीचा प्रयत्न झाला पण... रुपाली चाकणकर यांची नवी माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल