TRENDING:

'आई, मॅचेस खेळायला पुण्याला जातोय', फुटबॉल खेळाडूचा मुंबईजवळील जंगलात आढळला मृतदेह

Last Updated:

मुंबई जवळच्या घनदाट जंगलात एका फुटबॉल खेळाडूचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई जवळच्या घनदाट जंगलात एका फुटबॉल खेळाडूचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. संबंधित खेळाडू पुण्याला फुटबॉल मॅचेस खेळण्यासाठी जात असल्याचं आपल्या आईला सांगितलं होतं. मात्र त्याचा अचानक संपर्क तुटला आणि दोन दिवसांनी तो पालघर जिल्ह्याच्या घनदाट जंगलात मृतावस्थेत आढळला आहे. एका फुटबॉल खेळाडूचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात केली आहे. पुढील तपास केला जात आहे.
News18
News18
advertisement

सागर सोरती असं मृत आढळलेल्या फुटबॉल खेळाडूचं नाव आहे. त्याने मुंबईच्या अंडर-16 फुटबॉल संघात आपल्या खेळाची छाप सोडली होती. एका उदयोन्मुख खेळाडूचा मृतदेह पालघर जिल्ह्यात संशयास्पद अवस्थेत आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सागर सोरतीचा मृतदेह पालघर जिल्ह्यातील मेंढवण खिंडच्या घनदाट जंगलात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेने क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून, अनेकांना मोठा धक्का बसला आहे.

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, सागर सोरती हा १५ नोव्हेंबर रोजी आपल्या घरातून पुण्याला फुटबॉल खेळायला जात असल्याचे सांगून बाहेर पडला होता. मात्र, १६ नोव्हेंबरपासून त्याचा कुटुंबाशी कोणताही संपर्क झाला नाही. कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला असतानाच, दोन दिवसांनी म्हणजेच १८ नोव्हेंबर रोजी कासा पोलिसांना मेंढवण खिंडच्या जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळला. घटनास्थळी त्याचा मोबाईल फोन असल्याने पोलिसांनी तात्काळ त्याची ओळख पटवली.

advertisement

मानसिक तणावाखाली होता सागर

सागरने इतके टोकाचे पाऊल का उचलले असावे, याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र सागर मागील जवळपास दोन वर्षांपासून मानसिक तणावाखाली होता. याच महिन्यात त्याच्या लहान भावाचे लग्न ठरले होते. तरीही त्याने नवीन कपडे शिवण्यास स्पष्ट नकार दिला होता. या मानसिक तणावामुळेच त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

advertisement

तपासासाठी मृतदेह जे.जे. रुग्णालयात

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शरिरासाठी पौष्टिक, हिवाळ्यात बनवा अंबाडीच्या फुलांची चटणी, चव अतिशय टेस्टी
सर्व पहा

या घटनेची नोंद कासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. पोलिसांना या घटनेमागे आत्महत्येचा संशय असला तरी, मृत्यूचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. सागरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच सागरच्या मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होईल आणि त्यानंतरच पोलीस पुढील तपास करतील, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'आई, मॅचेस खेळायला पुण्याला जातोय', फुटबॉल खेळाडूचा मुंबईजवळील जंगलात आढळला मृतदेह
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल