या सगळ्या घटनाक्रमानंतर आता आंचल, तिचे वडील गणेश मामीडवार आणि सक्षम ताटे या तिघांच्या डान्सचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तिघेही भीमजयंतीच्या मिरवणुकीत नाचत आहेत. यावरून सक्षम आणि मामीडवार कुटुंबीयांचे संबंध किती चांगले होते, हे दिसून येत आहे. या डान्सचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंचलचे वडील गणेश मामीडवार हे गेल्यावर्षी 14 एप्रिल रोजीच्या भीम जयंती मिरवणुकीत सहभागी झाले होते. या मिरवणुकीत आंचल देखील त्यांच्यासोबत होती. गणेश मामीडवार या मिरवणुकीत सक्षमसोबत नाचले. आँचल आणि सक्षम देखील सोबत या मिरवणुकीत नाचताना दिसत आहेत. दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.
advertisement
आता हा व्हिडियो समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. समक्षसोबत इतके चांगले संबंध असताना गणेश मामीडवार त्याच्या घात करतील, असं कोणालाही वाटलं नव्हतं. आंचलने दिलेल्या माहितीनुसार, तिचे दोन्ही भाऊ आणि सक्षम खूप चांगले मित्र होते. यातूनच सक्षमचं आंचलच्या घरी येणं-जाणं होतं. यातूनच तीन वर्षांपूर्वी दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. पण या प्रेमाचा अत्यंत दुर्दैवी शेवट झाला आहे.
