TRENDING:

जयंत पाटील यांच्या स्वर्गीय वडिलांच्या प्रतिमेवर जादूटोणा, निवडणूक काळात सांगलीतला धक्कादायक प्रकार

Last Updated:

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील येलूर येथे स्व. राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमेवर जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
असिफ मुरसल, प्रतिनिधी, सांगली : सांगलीत निवडणुकांच्या धामधुमीत राष्ट्रवादीचे नेते, आमदार जयंत पाटील यांचे वडील स्व. राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमेवर जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराविरोधात राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आक्रमक झाले असून संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमेवर जादूटोणा
राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमेवर जादूटोणा
advertisement

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील येलूर येथे स्व. राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमेवर जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

स्व.राजाराम बापू पाटील यांचा फोटो असलेल्या पोस्टरवर काळा रंग फासून, टाचण्या टोचून त्यावर लिंबू, केळी असा उतारा करून रस्त्याच्याकडेला राजारामबापू यांचा फोटो टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे वाळवा तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी लेक उतरली मैदानात, मोनाच्या जिद्दीचा प्रवास! Video
सर्व पहा

नुकतेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका करताना स्व. राजाराम बापू पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. आता या नव्या प्रकारामुळे देखील निवडणूक काळात असाच वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जयंत पाटील यांच्या स्वर्गीय वडिलांच्या प्रतिमेवर जादूटोणा, निवडणूक काळात सांगलीतला धक्कादायक प्रकार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल