सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे ही माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडली आहे.केवळ चोरीच्या संशयावरून नाना हैबत यमगर या निर्दयी बापाने पोटच्या दोन मुलींना रात्रभर टांगून ठेवत अमानुष छळ केला होता. केवळ शेजारच्या घरात चोरी केल्याचा संशय शेजाऱ्याने घेतल्याने संतापाच्या भरात या दोन चिमुकल्यांवर निर्दयी अत्याचार करण्यात आला.
दरम्यान घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास वडीलाने सानिका आणि अनुजा या दोन्ही मुलींना हात-पाय बांधून घरातील पत्र्याच्या अँगलला उलट्या टांगण्यात आले. रात्रभर त्या निष्पाप मुली वेदनेने तडफडत “पाणी, पाणी” म्हणून ओरडत होत्या. मात्र, त्यांच्याच आई-वडिलांनी त्यांना पाण्याचा थेंबही दिला नाही. मुलींना वरती बांधून निष्ठुर आई-वडील घरातच निर्धास्त झोपले होते, तर बाहेर आजी-आजोबा झोपले होते. रात्रभर असह्य वेदनेने सानिकाने रात्रीच प्राण सोडला होता तर आई वडील पोटच्या मुलीच्या प्रेता खालीच निर्धास्तपणे झोपले होते.
advertisement
गुरुवारी सकाळी सुमारे ६ वाजता मुलीच्या आजोबांनी मुलींना खाली सोडण्यात आले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सानिका ही मृतावस्थेत आढळली, तर अनुजा बेशुद्ध अवस्थेत होती. तिला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मृत सानिका ला दुसऱ्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र तेथे ती मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर नातेवाईक सानिकाचा मृतदेह घरी घेऊन आले.
दरम्यान, ही घटना बाहेर येऊ नये म्हणून संबंधित कुटुंबीयांनी मयत सानिकेचा अंत्यसंस्कार गुपचूप करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आई-वडील, आजी-आजोबा तसेच काही नातेवाईकांनी मिळून हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केल्याचा बोलले जात आहे. मात्र, जखमी अनुजाने रुग्णालयात शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टरांना दिलेल्या जबाबात संपूर्ण प्रकार उघडकीस आला. सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.
