TRENDING:

आई जन्म देऊन पळाली, निरोप देताना 3 महिन्याच्या 'वीरप्रताप'नं सगळ्यांना रडवलं, सांगलीच्या हॉस्पिटलमध्ये काय घडलं?

Last Updated:

बाळाला निरोप देण्यापूर्वी सिव्हिल हॉस्पिटलच्या स्टाफने त्याचे नामकरण केले. आईविना पोरका राहिलेल्या या बाळाला ‘वीरप्रताप’ असे नाव देण्यात आले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

सांगली : सांगलीमधून एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून एका आईने बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी आपल्या नवजात बाळाला सोडून पळून गेली. मात्र, या निष्पाप बाळाला सिव्हिल हॉस्पिटलच्या स्टाफने आई-वडिलांसारखे प्रेम देत तब्बल तीन महिने सांभाळले. आता शासनाच्या आदेशानुसार या बाळाला पुण्याकडे रवाना करण्यात आले असून, निरोप देताना स्टाफच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले.बाळाला निरोप देण्यापूर्वी सिव्हिल हॉस्पिटलच्या स्टाफने त्याचे नामकरण केले. आईविना पोरका राहिलेल्या या बाळाला ‘वीरप्रताप’ असे नाव देण्यात आले.

advertisement

नेमकं काय घडलं? 

सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 26 नोव्हेंबर 2025 रोजी या बाळाचा जन्म झाला. जन्म देऊन दुसऱ्याच दिवशी त्या बाळाची आई बाळाला सोडून पळून गेली. आईचा शोध घेतला मात्र आढळून आली नाही. त्यातच बाळ शारीरिक दृष्ट्या नाजूक असल्याने त्या बाळाचा सांभाळ तेथीलच स्टाफने करण्याचा निर्णय घेतला. तब्बल 15 दिवस बाळाला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.

advertisement

या दरम्यान बाळाला हर्निया झाल्याचेही समोर आले. त्यावर ऑपरेशन सुद्धा करण्यात आले. त्यानंतर आजपर्यंत हे बाळ सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या विशेष नवजात शिशु दक्षता केंद्रातील स्टाफ सांभाळत होते. तब्बल तीन महिने या बाळाचा सांभाळ केलेल्या बाळाला कोर्टाच्या आदेशाने पुण्याला पाठवण्यात आले. याबाबतचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून पाठक शिशु केंद्राकडे हे बाळ डीन प्रकाश गुरव यांनी सुपूर्त केले.

advertisement

तत्पूर्वी सिव्हिलच्या सर्व नर्सिंग स्टाफने बाळाच्या नामकरणाची तयारी केली. पाळणा सजवण्यात आला. रांगोळ्या काढण्यात आल्या. फुग्यांनी सजावट करण्यात आली. यावेळी या अनाथ बाळासाठी पाळणा सुद्धा म्हटला. यावेळी आईविना पोरका झालेल्या बाळाचे नाव सर्वांनी मिळून वीरप्रताप ठेवण्यात आले.

शासनाच्या आदेशाने हा तीन महिन्याचा वीर प्रताप काल पुण्याकडे रवाना होणार होता. त्यामुळे त्याला निरोप देण्यासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ एकत्र आला होता. यावेळी तीन महिने सांभाळ केलेल्या बाळाला पाठवताना येथील स्टाफला गहिवरून आले तर काहींना रडू कोसळले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अशी ही रुग्णसेवा, छ. संभाजीनगरमध्ये गरजूंना होतीये मोठी मोफत मदत, अनोखा उपक्रम काय?
सर्व पहा

जन्म झाल्यावर आईचे छत्र गेले मात्र सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रत्येक नर्स, डॉक्टरांनी या बाळाला तीन महिने आईचे प्रेम देऊन सांभाळ केला. त्यामुळे या तीन महिन्याच्या वीर प्रतापला निरोप देताना अनेकांना अश्रू रोखता आले नाहीत. आईविना सांभाळलेल्या वीरप्रतापने जाताना मात्र शेकडो आई निर्माण केल्या.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
आई जन्म देऊन पळाली, निरोप देताना 3 महिन्याच्या 'वीरप्रताप'नं सगळ्यांना रडवलं, सांगलीच्या हॉस्पिटलमध्ये काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल