घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सांगलीच्या कवठेमहांकाळमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. मात्र हल्लेखोराकडे असलेली रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने गोळीच उडाली नाही. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला आहे. ही संपूर्ण घटना मात्र सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हल्ल्याचा प्रयत्न फसल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
कवठेमहांकाळ येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते दिनकर पाटील यांचा पुतण्या अभिजित पाटील यांच्यावर अज्ञात तरुणाने गोळीबाराचा प्रयत्न केला. मात्र रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने गोळी उडाली नाही. रात्री कवठेमहांकाळ शहरातील एका मोबाइल शॉपीमध्ये हा प्रकार घडला आहे.मात्र या घटनेची शनिवारी रात्री उशिरापर्यंत येथील पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली नव्हती.
advertisement
अभिजित हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते दिनकर पाटील यांचे बंधू युवराज पाटील यांचे पुत्र आहेत. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ते तहसील कार्यालयासमोरील एका मोबाइल दुकानात आले होते. यावेळी एका अज्ञाताने दुकानात प्रवेश करीत रिव्हॉल्व्हरमधून त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. पण रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने गोळी उडाली नाही. यामुळे अभिजित थोडक्यात बचावले आहेत. या प्रकारानं खळबळ उडाली आहे.