नामवंत पैलवानाचे निधन
अविनाश महादेव पाटील (वय-54) आणि त्यांची आई सुधाताई महादेव पाटील (वय-75) अशी या माय-लेकांची नावे आहेत. कुमठे येथील जिल्हा परिषद शाळेजवळ अविनाश पाटील आपल्या कुटुंबासोबत राहत होते. ते एक नामवंत पैलवान म्हणून ओळखले जात असत. तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहून कुस्तीकडे वळावे, यासाठी ते नेहमीच प्रयत्न करत.
advertisement
गेल्या काही दिवसांपासून अविनाश गंभीर आजाराशी झुंज देत होते. अखेर मंगळवारी पहाटे 5.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वत्र शोककळा पसरली. नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत सकाळी 7.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुलाच्या दुःखात आईही गेली
पण नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते. मुलाच्या मृत्यूचा आघात आणि त्याच्या अंत्यसंस्काराचा धक्का आई सुधाताई पाटील यांना सहन झाला नाही. मुलाच्या अंत्यविधीनंतर अवघ्या काही तासांतच, सकाळी 11.30 वाजता त्यांचीही प्राणज्योत मालवली. जे नातेवाईक आणि मित्रपरिवार अविनाशच्या अंत्यसंस्कारासाठी आले होते, ते आपल्या घराकडे परतत असतानाच त्यांना सुगताबाई यांच्या निधनाची बातमी कळाली.
अवघ्या पाच तासांच्या अंतराने माय-लेकाचा मृत्यू झाल्याने कुमठे गावात शोककळा पसरली. पाटील कुटुंबीयांवर नियतीने क्रूर सूड उगवल्याची भावना सर्वजण व्यक्त करत आहेत. अविनाश यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई आणि सुना असा मोठा परिवार आहे.
हे ही वाचा : नियतीचा क्रूर खेळ! चिमुरडीचा जन्म 'हीच' आईच्या मृत्यूची आठवण ठरली; घर पूर्ण झालं, पण...
हे ही वाचा : Satara News: पत्नीशी झालं भांडण, पती चढला गडाच्या कड्यावर, उडी मारून आत्महत्या करणार इतक्यात...