Satara News: पत्नीशी झालं भांडण, पती चढला गडाच्या कड्यावर, उडी मारून आत्महत्या करणार इतक्यात...

Last Updated:

पत्नीसोबत झालेल्या भांडणातून मानसिक तणावाखाली असलेल्या एका तरुणाने अजिंक्यतारा किल्ल्याच्या कड्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी...

Satara News
Satara News
सातारा : पत्नीसोबत झालेल्या भांडणातून मानसिक तणावाखाली असलेल्या एका तरुणाने अजिंक्यतारा किल्ल्याच्या कड्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच माहिती मिळाल्याने पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तरुणाचा जीव वाचवला.
पोलिसांना आला मदतीचा फोन
गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास शाहूपुरी पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. अजिंक्यतारा किल्ल्याच्या दक्षिण दरवाजाजवळ एक तरुण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती फोन करणाऱ्याने दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शाहूपुरी पोलिसांनी तातडीने सातारा शहर पोलीस ठाण्याला कळवले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पीसीआर व्हॅन, बीट मार्शल आणि दोन्ही पोलीस ठाण्यांची गुन्हे प्रकटीकरण पथके तात्काळ अजिंक्यतारा किल्ल्यावर पोहोचली.
advertisement
कड्याच्या टोकावरून खाली आणले
पोलिसांनी दक्षिण दरवाजावर जाऊन पाहिले असता, शांताराम लक्ष्मण पवार (वय-24, रा. समर्थ नगर, सातारा) नावाचा तरुण कड्याच्या अगदी टोकावर उभा होता. पीसीआर वाहनावरील चालक हवालदार बनकर आणि महिला हवालदार महाडिक यांनी शांतपणे त्याच्याशी संवाद साधला. त्यांनी त्याची समजूत घालून आत्महत्या करण्यापासून त्याला परावृत्त केले.
पोलिसांच्या बोलण्याचा सकारात्मक परिणाम झाला आणि तो तरुण कड्यावरून खाली उतरण्यास तयार झाला. पोलिसांनी त्याला सुरक्षितपणे खाली आणले. चौकशीदरम्यान, त्याने पत्नीसोबतच्या भांडणामुळे मानसिक तणावात असल्यामुळे आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी या तरुणाला धीर देऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्याला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Satara News: पत्नीशी झालं भांडण, पती चढला गडाच्या कड्यावर, उडी मारून आत्महत्या करणार इतक्यात...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement