'उशिरा का आलीस?' म्हणत पती बनला हैवान; लाकडी दांडक्याने पत्नीला इतकी मारहाण केली की, त्यातच...

Last Updated:

परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात एका पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. अनुसया वाघमारे नावाची 35 वर्षीय महिला बाजार करून उशिरा परत आल्याने पती रामा वाघमारे संतापला...

Crime News
Crime News
मानवत (परभणी) : मानवत तालुक्यातील वांगी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने लाकडी दांडक्याने मारहाण करून 35 वर्षीय पत्नीचा खून केल्याचा प्रकार 6 ऑगस्टच्या पहाटे उघडकीस आला. अनुसया वाघमारे असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला तात्काळ अटक केली आहे.
'उशिरा का आलीस?' म्हणून सुरू झाला वाद
अनुसया वाघमारे या पती रामा वाघमारे यांच्यासोबत वांगी येथे खोपी (झोपडी) घालून राहत होत्या. कोळसा तयार करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. 6 ऑगस्ट रोजी पहाटे अनुसया मृतावस्थेत आढळल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत, पती रामा वाघमारेने मंगळवारी रात्री 7 वाजता खोपीत पत्नी अनुसयाला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचे समोर आले. या मारहाणीतच तिचा मृत्यू झाला. अनुसयाच्या अंगावर मारहाणीच्या जखमा स्पष्ट दिसत होत्या. पोलिसांनी मृतदेहाचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केले. या प्रकरणी प्रकाश पवार यांच्या तक्रारीवरून रामा वाघमारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
मुलामुळे उघडकीस आले कृत्य
हा प्रकार उघडकीस कसा आला, याबद्दलही माहिती समोर आली आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता अनुसया आणि रामा हे दोघेही वझुर येथे बाजार करण्यासाठी गेले होते. बाजार आटपल्यानंतर 'तू पुढे जा' असे सांगून रामा वझुर येथेच थांबला होता. सायंकाळी 5 वाजता तो खोपीत परत आल्यावर त्याला पत्नी दिसली नाही. त्यानंतर रात्री 7 वाजता अनुसया परत आल्यावर 'उशिरा का आलीस?' असे म्हणून रामा रागाच्या भरात तिच्यासोबत भांडण करू लागला आणि तिला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरूवात केली.
advertisement
या मारहाणीनंतर अनुसया जमिनीवर निपचित पडली होती. आई काहीच हालचाल करत नसल्याचे पाहून मुलगा रोशन याने शेजाऱ्यांना सांगितले, तेव्हा हा क्रूर प्रकार उघडकीस आला.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
'उशिरा का आलीस?' म्हणत पती बनला हैवान; लाकडी दांडक्याने पत्नीला इतकी मारहाण केली की, त्यातच...
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement