नियतीचा अजब खेळ! 5 वर्षांचा संसार, 2 मुलांची आई... पण अल्पवयीन; दुसऱ्यांदा बाप होणाऱ्या पतीवर 'पोक्सो'चा गुन्हा

Last Updated:

कोल्हापूर जिल्ह्यातील शिये येथे पाच वर्षांपासून सुखी संसार करणाऱ्या एका तरुण जोडप्याच्या आयुष्यात नियमित आरोग्य तपासणीमुळे कायद्याचे वादळ आले. दुसऱ्यांदा...

Kolhapur Crime
Kolhapur Crime
कोल्हापूर : पाच वर्षांचा सुखी संसार, घरात एका मुलाचा बागडण्याचा आवाज आणि आता दुसऱ्या बाळाच्या आगमनाची गोड प्रतीक्षा... शियेमधील एका तरुण जोडप्याच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत चालू होते. मात्र, एका नियमित आरोग्य तपासणीने त्यांच्या आयुष्यात कायद्याचे असे वादळ आणले की, त्यांचा आनंदी संसार क्षणात उद्ध्वस्त झाला.
5 वर्षांचा केला संसार, पण विवाहितेचं वय फक्त 17 वर्षे
आपल्या गर्भवती पत्नीला घेऊन तो तरुण रुग्णालयात पोहोचला. डॉक्टरांनी तपासणी करताना सहजच पत्नीचे वय विचारले. अशिक्षित असल्याने तिला आपले नेमके वय सांगता आले नाही. डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी कागदपत्रांची तपासणी केली, तेव्हा एक धक्कादायक सत्य समोर आले. पाच वर्षांपासून संसार करणारी आणि दुसऱ्यांदा आई होणारी ती विवाहिता केवळ 17 वर्षांची होती.
advertisement
पतीविरोधात नाइलाजाने द्यावी लागली तक्रार
हे सत्य समोर येताच कायद्याची चक्रे फिरू लागली. डॉक्टरांनी तातडीने याची माहिती पोलिसांना आणि समाजकल्याण विभागाला दिली. अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवणे हा 'पोक्सो' कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा असल्याने, पोलिसांना कारवाई करणे भाग होते. नियतीचा खेळ इतका विचित्र की, ज्या पत्नीने पतीसोबत सुखी जीवनाची स्वप्ने पाहिली होती, तिलाच आपल्या पतीविरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली.
advertisement
पतीवर गुन्हा, मुलांचं भविष्य अंधारात
एकीकडे पतीच्या प्रेमाचे पाश, दुसरीकडे पोटात वाढणारे बाळ आणि समोर कायद्याचा बडगा; या चक्रव्यूहात अडकलेल्या त्या अल्पवयीन मातेची अवस्था दयनीय झाली होती. डॉक्टरांच्या मते, कमी वयात गर्भधारणा झाल्याने तिच्या आणि बाळाच्या जीवालाही धोका होता. या एका घटनेने सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या त्या कुटुंबावर आभाळच कोसळले असून, पतीवर गुन्हा दाखल झाल्याने त्यांचे भविष्य अंधारात सापडले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
नियतीचा अजब खेळ! 5 वर्षांचा संसार, 2 मुलांची आई... पण अल्पवयीन; दुसऱ्यांदा बाप होणाऱ्या पतीवर 'पोक्सो'चा गुन्हा
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement